Dhule Fruits Rate Hike : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू झाला आहे. मात्र, बाजारात अपेक्षित प्रमाणात फळांची आवक नसल्याने फळांचे दर वाढले आहेत. सध्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उपवास काळात शरीरातील साखर आणि पाण्याचे संतुलन राखण्यासाठी सायंकाळी रसाळ आणि पाणीदार फळे आहारात घेतली जात आहेत. त्यात कलिंगड, काकडी, गाजर, अननस या फळांचा समावेश आहे. (Dhule Due to lack of expected quantity of fruits in market prices of fruits have increased)
मागणी जास्त असून, आवक कमी असल्यामुळे झाली आहे, असे फळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यास सुरवात झाली आहे. या काळात रोज पाच वेळा प्रार्थनास्थळी नमाजपठण करणे, कुरआन पठण करणे असा उपक्रम असतो. नमाजपठण करीत उपवास राखले तर पुण्याचा संचय होतो, अशी मुस्लिम बांधवांची धारणा आहे.
या काळात तापमान वाढल्यामुळे शरीर संतुलन राखण्यासाठी आहारात फळे घेतली जातात. त्यात पाणीदार आणि गोड असणाऱ्या फळांची मागणी असते. (latest marathi news)
त्यात कलिंगड, अननस, काकडी, गाजर, द्राक्ष यांसारख्या फळांचा समावेश आहे. फळाची आवक कमी असल्याने भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परंतु आवक वाढल्यास भाव कमी होतील, असेही विक्रेत्यांनी सांगितले. सध्या बाजारात कलिंगडाची आवक वाढत असून, दर कमी होत आहेत. साधारणपणे २५ रुपयांत एक कलिंगड, या दराने विक्री होत आहे. सध्या सोलापूर, अहमदाबाद, सुरत तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून कलिंगडांची आवक होत आहे, असे विक्रेते फारूक पठाण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.