Students while waiting for bus. In second photo, students walking to school in absence of a bus. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बसच्या खोळंब्याने विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : आदिवासी गावातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ असूनही फक्त एसटीची सुविधा नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष घालून पायपीट थांबविण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून मोफत एसटी बससेवा दिली जाते. (Dhule Due to non availability of ST bus facilities education of some students is interrupted)

असे असताना शिरपूर आगाराच्या ढिसाळ कारभारामुळे शेमल्या, मोहिदा, कोळशापाणी येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, पळासनेर येथे मुलांना ये-जा करण्यासाठी रोज आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

याबाबत गावातील सरपंचासह पालक व शाळेतील मुख्यध्यापकांतर्फे वारंवार पाठपुरावा करूनही शिरपूर आगाराकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींसह पालकही हवालदिल झाले आहेत.

शेमल्या (ता. शिरपूर) येथील विद्यार्थ्यांना गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. पुढील माध्यमिक शिक्षणासाठी स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, पळासनेर येथे शेमल्या, मोहिदा, काळापाणीचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेणारे दोनशे विद्यार्थी आहेत. (latest marathi news)

सकाळी सातला आणि दुपारी बाराला वेळेत बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाइलाजाने रोज ये-जा करण्यासाठी आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागते. दुपार सत्रातील ४५ मुलींकडे एसटी पास असून, बस वेळेवर येत नसल्यामुळे कुचकामी ठरत आहे. सायंकाळी चार-साडेचारला पळासनेरला येते तेव्हा आम्ही शाळेत असतो.

त्यामुळे त्या बसचाही काही उपयोग होत नसल्यामुळे मुले-मुली पायी प्रवास करतात. सायंकाळी पाचनंतर मात्र खासगी वाहनेही बंद होतात. त्यामुळे पायी जाण्याशिवाय गत्यंतर नाही. अनेकदा सायंकाळी उशिरा अंधार झाल्यावर शेमल्या, पळासनेरदरम्यान वन विभागाचे जंगल असल्यामुळे मुलींना भीतीही वाटते.

मुलींना दीर्घकाळ घराबाहेर राहणे, सायंकाळी पायी उशिरा येणे, त्यामुळे पालकांमधून चिंता व्यक्त केली जाते. शिरपूर आगारातील व्यवस्थापकांनी शाळेच्या वेळेनुसार शिरपूर पळासनेरमार्गे शेमल्या, मोहिदा ते पळासनेर सकाळी सातला व दुपारी बारा तसेच सायंकाळी पाचला घरी मुलांना येण्यासाठी बससेवा सुरळीत सुरू करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT