Workers working to restore power supply on Saturday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: वादळामुळे शेतीसह संसारोपयोगी साहित्याची धुळधाण! म्हसदी, वसमारमध्ये सुमारे पावणेसहा लाखांच्या नुकसानीचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : दुष्काळाने होरपळून निघालेल्या बळीराजास मृगाच्या प्रारंभीच जोरदार पावसाने दिलासा दिला असला तरी जोरदार वादळामुळे दाणादाण उडत म्हसदी व वसमार (ता. साक्री) येथील शेतकऱ्यांच्या शेतातील घरातील पत्रे, शेती-संसारोपयोगी साहित्य, पत्र्याचे शेड, पोल्ट्री शेडमधील कोंबड्या, कांदा चाळ, चाळीतील कांदा, बियाणे, धान्य, बांधावरील आंब्यासह इतर वृक्षांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार केवळ म्हसदी, वसमार येथील शेतकऱ्यांचे अंदाजे सुमारे पाच लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान झाले असून इतरत्र परिस्थिती वेगळी असू शकते. (Dhule Due to storm agriculture household materials destroyed)

मृग नक्षत्रात पाऊस होण्यासाठी बळिराजा आकाशाकडे डोळे लावून बसतो. यंदा मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावली. दुसरीकडे वादळाने नुकसानीचा चटकाही दिला आहे. अलीकडे शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत जोडधंदाही करू लागला आहे.

शेतात स्वतःसह परिवाराला राहण्यासाठी पत्र्याचे घर, पाळीव प्राण्यांसाठी पत्र्याचे शेड, कांदा चाळ, पोल्ट्री फार्म आदी लवाजम्याकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहे. यंदाच्या पहिल्या पावसाने बळीराजाचा लवाजमाच उद्ध्वस्त झाला आहे. शनिवारी (ता.८) दिवसभर तलाठी अमोल बोरसे, पोलिस पाटील प्रमोद निकम यांनी नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा केला.

नुकसानीची भरपाई मिळावी

यंदाच्या तीव्र दुष्काळात शेतकरी सर्वच बाजूंनी पोळला गेला असून आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामाची आस बाळगून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजास वादळाचा तडाखा बसला आहे. यंदा वेधशाळेने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षभर कोरडवाहूच काय तर बागायतदार शेतकऱ्याच्या हाती काही लागले नाही. यंदा नवीन खरीप हंगामाविषयी अधिक अपेक्षा आहेत. शासनाने नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

वीज कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न

शुक्रवारच्या रात्री उशिराच्या प्रचंड वादळ, पावसामुळे वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले आहे. वादळामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब वाकणे व इतर तत्सम बिघाड हमखास होतो. दुसरीकडे जास्त वेळ वीज पुरवठा खंडित झाल्यावर वीज ग्राहकांचा रोष व्यक्त होतो.

शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून शनिवारी रात्री उशिरापर्यंत वीज कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत वीज पुरवठा सुरळीत केला. गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत ग्राहकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा कनिष्ठ अभियंता बी. बी. सूर्यवंशीसह वीज कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (latest marathi news)

नुकसानग्रस्त शेतकरी (कंसात नुकसान रक्कम रुपयांत)

म्हसदी

राकेश दगाजी देवरे- शेतातील पत्र्याचे घर (८० हजार)

महेंद्र शांताराम ह्याळीस- शेतातील पत्र्याचे घर व कांदा पीक (दोन लाख ८० हजार)

योगेश हिरामण देवरे- पोल्ट्रीचे नुकसान होत चारशे

कोंबड्या मृत्यूमुखी (४० हजार)

रावसाहेब सीताराम देवरे- शेतातील घराचे नुकसान (७० हजार)

देविदास गजमल देवरे- शेतातील घराचे नुकसान (दहा हजार)

प्रकाश लोटन देवरे- शेतातील शेडचे नुकसान (बारा हजार)

वसमार

प्रकाश लोटन नेरे- शेतातील घराचे नुकसान (५५ हजार)

मधुकर खंडू काकूस्ते- शेतातील घराचे नुकसान (३० हजार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT