E-Peek Pahani  esakal
उत्तर महाराष्ट्र

E-Peek Pahani : एक ऑगस्टपासून ई-पीक पाहणी! जिल्ह्यात 3 लाख 79 हजार हेक्टरवर क्षेत्रात खरिपाचा पेरा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी येत्या १ ऑगस्टपासून चालू खरीप हंगामांतर्गत मोबाईलद्वारे ई-पीक पाहणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यंदा १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी सरासरी ८९.४५ टक्क्यांवर पीक पेरा पूर्ण केला आहे. जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात तीन लाख ७९ हजार ६२९ हेक्टर क्षेत्रात पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. (E-peek inspection from August 1 for farmers)

पैकी दोन लाख ८९ हजार नऊशे नऊ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात पेरण्यांची गती चांगली आहे. पेरण्यांनंतरची विविध पिकांच्या रोप उगवणीबाबत किंवा वाढीच्या अवस्थांविषयी कोणत्याही तालुक्यातून अद्याप तक्रार आलेली नाही.

२० टक्के अधिक पाऊस

जिल्ह्यात १ जून ते १५ जुलैदरम्यान सरासरी २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतेक खरीप पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपल्या आहेत. आरंभी केवळ धुळे तालुक्यात जोरदार हजेरी लावत सलामी देणाऱ्या पावसाने आर्द्रा नक्षत्रात साक्री, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात मेघसरींनी हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. यंदा दोन लाख तीन हजार चार हेक्टरवर पांढरे सोने (कापूस), तर त्या खालोखाल एक लाख २८ हजार ७१२ हेक्टरवर तृणधान्याची पेरणी अपेक्षित आहे.

ई-पीकचे नियोजन

गेल्या वर्षीच्या तीव्र दुष्काळाने बळीराजा पुरता पिचून गेला आहे. हवामान विभाग व वेधशाळेच्या अंदाजानुसार चांगल्या दमदार पावसाचे संकेत मिळाल्याने तूर्तास दिलासा मिळाला आहे. ज्या भागात लवकर पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी कोळपणी, विरळणी, रासायनिक खते देणे, निंदणी व तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ई-पीक पाहणीची जबाबदारी भूमी अभिलेख आयुक्तालयाकडे आहे. त्याविषयीच्या नियोजनाचा आढावा अलीकडेच घेण्यात आला. (latest marathi news)

पंचेचाळीस दिवस पाहणी

कृषी यंत्रणेच्या माहितीनुसार शेतकरीस्तरावरील ई-पीक पाहणी १ ऑगस्टपासून सुरू झाल्यानंतर ४५ दिवस सुरू राहील. १५ सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीक पाहणी समाप्त होईल. शासनाकडून शेतकऱ्यांना पुन्हा मुदतवाढ न मिळाल्यास लगेच १६ सप्टेंबरपासून तलाठी किंवा सहाय्यक स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. तलाठी आपापल्या पातळीवरील पाहणीची कामे पुढील तीस दिवस म्हणजेच १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवतील.

डिजिटल क्रॉप सर्व्हे

केंद्राने डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) पद्धत चालू खरीप हंगामापासून लागू केली आहे. तरीदेखील राज्य शासनानेही ई-पीक पाहणी राज्यस्तरीय पद्धत स्वतंत्रपणे राबविण्याचा निर्णय सुरू ठेवला आहे. अर्थात दोन्ही पद्धतीच्या ई-पीक पाहणीसाठी वापरले जाणारे उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) एकच ठेवण्यात आले आहे. सर्व तालुक्यांमध्ये राज्य शासनाच्या जुन्या पद्धतीनुसार ई-पीक पाहणी होणार आहे, असे कृषी यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT