Dharti Deore present at the felicitation ceremony of Sanjivani Shisode after being elected as the group leader of the Zilla Parishad. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : गटनेतेपदी भाजपच्या शिसोदे यांची निवड; धुळे जिल्हा परिषद

भाजपच्या जिल्हा परिषदेच्या गटनेते पदावरून कुसुम निकम यांची हकालपट्टी करीत त्यांच्या जागी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तथा नरडाणे गटाच्या सदस्या संजीवनी शिसोदे यांची निवड करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या व्यासपीठावर बसणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा भाजपच्या विद्यमान सदस्या कुसुम निकम यांनी सदस्यपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी इतर सदस्यांनी केली. तसेच भाजपच्या जिल्हा परिषदेच्या गटनेते पदावरून कुसुम निकम यांची हकालपट्टी करीत त्यांच्या जागी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तथा नरडाणे गटाच्या सदस्या संजीवनी शिसोदे यांची निवड करण्यात आली. (Election of BJP Shisode as group leader)

अशी माहिती शिंदखेडा तालुका भाजपने दिली. जिल्हा परिषदेच्या २०२० मधील निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. त्यात आमदार जयकुमार रावल यांनी कार्यकर्ते कामराज निकम यांच्या पत्नी तथा विखरण गटाच्या सदस्या कुसुम निकम यांची पक्षाच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी निवड केली होती. नंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची संधी दिली होती. अडीच वर्षे त्या उपाध्यक्ष होत्या.

निकम यांची उचलबांगडी

गेल्या आठवड्यात त्यांचे पती कामराज निकम यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शिंदखेडा येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या मेळाव्यात कुसुम निकम व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांची भाजपच्या गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून.

त्यांच्या जागी माजी महिला व बालकल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या संजीवनी शिसोदे यांची जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत मंगळवारी (ता. ३०) निवड करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे, शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, समाजकल्याण सभापती कैलास पावरा आदी उपस्थित होते. (latest marathi news)

राजीनामा द्यावा

जिल्हा परिषदेत मंगळवारी सर्वसाधारण सभा झाली. यात भाजपचे मेथी गटाचे सदस्य प्रभाकर पाटील यांनी कुसुम निकम यांनी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. भाजपच्या तिकिटावर निवडून येत विरोधी पक्षाच्या मेळाव्यात उपस्थित राहणे.

भाजपशी बेईमानी केली जात असल्याने कुसुम निकम यांनी सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. त्यास पाठिंबा म्हणून गट नेत्या शिसोदे, सभापती बोरसे, सभापती कदम, सदस्या सत्याभामा मंगळे यांनी सौ. निकम यांनी सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सभेत केल्याचे शिंदखेडा तालुका भाजपने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT