Dhule News : राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४३८ महिलांची नोंदणी झाली आहे. नोंदणी अर्जामध्ये १ लाख ११ हजार ७३८ महिलांनी ऑफलाईन. (Enrollment of women over 2 lakhs in the district)
तर ८८ हजार ७०० महिलांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या व्यापक प्रचारामुळे तसेच दोन हजार २२८ प्रशिक्षण देण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांमार्फत शहरी व ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्याप सुरू आहे.
अर्ज संकलन सुरू
जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नियोजनामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे- पाटील यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यात दोन हजार ५७६ केंद्रांवर महिलांचे अर्ज जमा करण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यातील सद्यःस्थिती
जिल्ह्यात जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत धुळे प्रकल्पात २० हजार ५७२ ऑनलाईन, तर १४ हजार ९९० ऑफलाईन, असे एकूण ३५ हजार ५६२ अर्ज, शिंदखेडा ग्रामीण १२ हजार १२१ ऑनलाईन, तर १२ हजार ९७३ ऑफलाईन, असे एकूण २५ हजार ९४ अर्ज. (latest marathi news)
शिरपूर ग्रामीण १३ हजार ५०३ ऑनलाईन, तर २५ हजार ९८९ ऑफलाईन, असे एकूण ३९ हजार ४९२ अर्ज, तसेच साक्री तालुक्यातील साक्री ग्रामीण क्षेत्रात २६ हजार २५४ ऑनलाईन, तर २९ हजार ३७४ ऑफलाईन, अशा एकूण ५५ हजार ६२८ महिलांनी नोंदणी केली आहे.
धुळे नागरी भाग
धुळे नागरी भागातील धुळे नागरी, शिरपूर, शिंदखेडा, साक्री व दोंडाईचा येथील २६७ अंगणवाडी केंद्रातून ८ हजार ६०७ ऑनलाईन, तर १३ हजार ८८ ऑफलाईन, असे एकूण २१ हजार ६९५, धुळे महापालिका, शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा, साक्री व पिंपळनेर नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील १४५ अंगणवाडी क्षेत्रात ७ हजार ६४३ ऑनलाईन, तसेच १५ हजार ३२४ ऑफलाईन, अशा एकूण २२ हजार ९६७ महिला लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
नारीशक्ती दूत ॲपची सुविधा
योजना लाभाचे अर्ज भरण्यासाठी धुळे जिल्ह्यात पाच हजार ९३८ नागरिकांनी नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड केले आहे. त्याचबरोबर या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होऊ नये, तसेच त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हाभरात दोन हजार ५७६ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. समितीमार्फत प्राप्त अर्जांची छाननी सुरू आहे, असे प्रशासनाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.