Tanker pouring water into a well. In the second photo, a mango orchard is drying up due to lack of sufficient water. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : टॅंकरने 5 एकर फळबागायत जगविण्याची केविलवाणी धडपड; मार्चपासून दररोज एक टॅंकर

Dhule : शिरडाणे (ता. धुळे) शिवारात दुष्काळाची भेदकता खूपच वाढली आहे. पाण्याअभावी फळबागायती जळायला लागल्या आहेत.

जगन्नाथ पाटील -सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिरडाणे (ता. धुळे) शिवारात दुष्काळाची भेदकता खूपच वाढली आहे. पाण्याअभावी फळबागायती जळायला लागल्या आहेत. पोटच्या लेकरांसम वाढविलेल्या बागायती जळताना बघून मन हेलावून टाकणारे दृश्य पाहायला मिळत आहे. काहींनी विकतचा टॅंकर आणून बागायत जगविण्याची धडपड सुरू ठेवलीय. प्रतिशेतकरी हा खर्च लाखावर गेलाय. शिरडाणे येथील प्रगतिशील शेतकरी मनीषा पाटील यांनी माळरानात फळबागायत फुलविली. ( farmer struggle to save 5 acre fruit garden with tanker )

तीन वर्षांपासून पोटच्या लेकरांसम सांभाळ करीत आल्या आहेत. तीव्र दुष्काळामुळे फेब्रुवारीपासूनच विहीर आटायला लागली अन् मार्चपासून दररोज टॅंकरने बागायत वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली. प्रारंभी प्रतिटॅंकर पाणी सहाशे रुपयांप्रमाणे मिळत होते. एप्रिलमध्ये दर हजार झाला. आता बाराशेप्रमाणे टॅंकर मिळत आहे. पाण्यावर लाखावर खर्च झालाय. यापुढेही प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पाच एकर फळबागायत

मनीषा पाटील यांनी पाच एकरावर फळ बागायत केलीय. यात तीनशेवर लिंबाची, चारशेवर बोरांची झाडे व अडीचशे आंब्याची झाडे आहेत. ही झाडे तीन वर्षांची झाली. नेमका पहिला हंगाम सुरू होईल, अशा स्थितीतच दुष्काळाने गाठलेय अन् पाण्याअभावी फुलगळती झाली. फळधारणा झालीच नाही. लिंबूबागेतील निम्मी झाडे पाण्याअभावी करपली आहेत. टॅंकरचे पाणीही कमी पडू लागलेय. फळझाडांकडे बघून डोळ्यात आसवे तरळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. (latest marathi news)

धरण उशाला कोरड घशाला

शिरडाणेपासून दीड किलोमीटरवर हंबाडा धरण आहे. हे धरण अक्कलपाड्याच्या पाटचारीने भरता येऊ शकते. येथून अक्कलपाडा आणि पाटचारीही काही किलोमीटरवर आहे. अक्कलपाडा भरल्यानंतर या धरणात पाणी टाकणे आवश्यक आहे. ही मागणीही जुनी आहे. नाहीतर हे धरण दुष्काळातही भरलेले दिसले असते, असे ग्रामस्थांनी सांगितले.

''पती तथा आदर्श शिक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनातून फळबागायत आकारास आली. दुष्काळामुळे पहिला हंगामही घेता आला नाही. या शिवारातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.''-मनीषा पाटील, महिला शेतकरी, शिरडाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT