Farmer Chandrakant Patil showing the loss of cotton. esakal
उत्तर महाराष्ट्र

Heavy Rain Damage Crop : कापडणेत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार! रात्रभर पाऊस; धुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : परिसरातील कापडणे, धनूर, लोणकुटे, तामसवाडी, हेंकळवाडी, कौठळ, मोहाडी, विश्वनाथ, सुकवद, न्याहळोद, जापी, शिरडाणे, बिलाडी, धमाणे, नगाव, तिसगाव, ढंढाणे, वडेल, रामनगर, सायने, देवभाने, सरवड भागात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळला. ऐन सुगीत मुसळधार पाऊस होत असल्याने, शेतकरी वैतागले आहेत. आता तर ‘जा बाबा’, अशी पावसाला आळवणी शेतकरी करीत आहेत. (Farmers loss in heavy rain taluka for crop )

दहा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पाऊस सक्रिय झालाय. ९ सप्टेंबरच्या सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळला. १० सप्टेंबरच्या रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. शुक्रवारी (ता. ११) तिसऱ्या दिवशीही दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी उशिरापर्यंत रिपरिप सुरू होती.

ओल्या कापसाचा भाव चार हजारांवर

कापूस वेचणीच्या ऐन हंगामात पावसाने कापसाचे नुकसान होत आहे. बोंडांतून फुटलेला कापूस जमिनीवर पडत आहे. त्याची प्रतवारी खराब होतेय. काही शेतकऱ्यांचे अधिकचे मजूर लावून कापूस वेचण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरताहेत. ओल्या कापसाचे दर प्रतिक्विंटल चार हजारांवर आले आहे. शेतकऱ्यां‍मधून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. (latest marathi news)

मका, बाजरीच्या कणसांना कोंब

मका व बाजरीचे पीक पंधरा दिवसांपासून तयार झालेय. २३ ते ३० सप्टेंबर सलग पाऊस झाल्याने काढणी झाली नाही. आता चार दिवसांपासून कापणी व काढणीला वेग आला होता. पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मक्याच्या भुणक्यांना व बाजरीच्या कणसांना कोंब फुटू लागले आहेत. मेथी, मुळा, कोथिंबीर आदी भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

सरसकट पंचनामे व्हावेत

सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. पंचवीस-तीस टक्केही हंगाम येणार नाही. सरसकट पंचनामे करून, नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: दोन वर्षांपासून गुजरात महाराष्ट्राला चालवत होता, आता जनताच न्याय करणार; मशाल धगधगणार! आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

"मामापासून लपून केलेलं वोटिंग ते बिग बॉसचा रनर अप" ; पृथ्वीक प्रतापचं अभिजीत सावंतसाठी खास पत्र ; "सुरजशी तो मायेने..."

Aditya Thackeray on Election: “दोन वर्षांपासून आम्ही वाट पाहत होतो....”; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंमध्ये दिसला उत्साह

Latest Maharashtra News Updates : झारखंड निवडणूक 2024 च्या CEC बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात पोहोचले

SCROLL FOR NEXT