Leopard footprints found by forest staff in Engde Shiwar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त! म्हसदीतील एंगडे शिवारात शेतकऱ्यांमध्ये भीती

सकाळ वृत्तसेवा

Dhule Leopard News : येथील एंगडे शिवारात गुरुवारी (ता. १६) सकाळी वन्यपशू बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त झाली. पहाटे साडेपाचनंतर शेतकरी दुधाची धार काढून घरी गेल्यावर पाठीमागे सकाळी सहाच्या सुमारास दिवस उजाडल्यावर बिबट्याने कालवडीवर हल्ला चढविला. हल्लेखोर बिबट्या एकटा नसून बिबट्याची जोडी व दोन बछडे असल्याची चर्चा आहे. येथील एंगडे शिवारात दगडू छबुलाल देवरे यांचे शेत आहे. ()

श्री. देवरे यांनी शेतातच औताचे बैल, दुभत्या जनावरांची सोय केली आहे. आज पहाटे शेतकरी कुटुंबातील दोघे बंधू गायी-म्हशीचे दूध काढून घरी आले. दूधवाटप केल्यावर अवघ्या तासाभरात शेतात गेल्यावर बिबट्याने कालवड फस्त केलेली दिसली. याचाच अर्थ पहाटे अंधारात बिबटे दबा धरून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत दोघे बंधू शेतात होते तोपर्यंत बिबट्याचे हल्ल्याचे धाडस झाले नाही.

वन विभागास माहिती दिल्यावर वनपाल डी. जी. पगारे, रमेश बच्छाव आदींनी पंचनामा केला. घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे व विष्ठा आढळली. गेल्या दोन दिवसांपासून लगतच्या शेतकऱ्यांना दर्शन देणाऱ्या बिबट्याची जोडी व दोन बछड्यांनी कालवडीवर डल्ला मारल्याने भीती व्यक्त केली जात आहे. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती व वाढत्या उष्णतेमुळे शेतकरी पशुधनासाठी कसेबसे पाणी, चारा समस्या दूर करत हतबल झाला आहे.

दुसरीकडे पशुधनावर वन्यपशू डल्ला मारत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. एंगडे शिवारालगतच्या शेतकऱ्यांना अनेक वेळा बिबट्याचे दर्शन घडले आहे. कालवडीवर हल्ला करणारी बिबट्याची जोडी व बछडे तेच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (latest marathi news)

भक्ष्य, पाण्यासाठी सैरभैर

यंदा अत्यल्प पावसामुळे वनक्षेत्रात वनतळी कोरडीठाक झाली आहेत. भक्ष्य, पाण्यासाठी वन्यपशू सैरभैर झाले आहेत. शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांसाठी पाण्यासाठी शेतात हौद बांधलेले असतात. त्या ठिकाणी बिबटे, तरस, वानरे आदी तहान भागवितात. पाण्यासाठी शेतशिवारात येणारे वन्यपशू शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला चढवत नुकसान करतात.

म्हसदीसह परिसरालगत मोठे आणि सुरक्षित वनक्षेत्र असल्याने वन्यपशूचा मुक्त संचार आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या मनुष्यावरदेखील हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर बिबट्याचा बंदोबस्त करत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे.

पशुपालकास भरपाई मिळावी

वन्यपशूचा हल्ला झाल्यावर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून वन विभागातर्फे मृत जनावरांचा पंचनामा केला जातो. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवाल दिल्यावर शासकीय नियमानुसार भरपाईही दिली जाते. दीर्घ प्रतीक्षेनंतर नुकसानग्रस्त पशुपालकास तुटपुंजी भरपाई दिली जाते. यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ही दगदग नको म्हणून अनेक शेतकरी वन विभागास कळवतदेखील नाहीत. वन विभागाने पंचनाम्यासह बंदोबस्तही करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

''वनक्षेत्रात लगतच्या शेतशिवाराकडे बिबटे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यंदा वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणी सैरभैर झाले आहेत. शेतकऱ्यांनी शेतात एकटे न जाता पाळीव प्राणीही बंदिस्त ठेवावेत.''-डी. जी. पगारे, वनपाल, म्हसदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT