Pick-up Shed Repaired by Toll Plaza Administration. esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL Impact : अखेर सोनगीर येथील पिक-अप शेडची दुरुस्ती

Dhule : बसथांब्यावरील टोल प्लाझाच्या पिक-अप शेडची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत असून, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध.

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : बसथांब्यावरील टोल प्लाझाच्या पिक-अप शेडची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत असून, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये (४ एप्रिल) प्रसिद्ध होताच टोल प्लाझा प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी पिक-अप शेडच्या दोन्ही बाजू नव्याने वेल्डिंग करून तसेच काँक्रिट टाकून शेड दुरुस्ती केली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. येथे अद्ययावत बसस्थानक व्हावे, अशी मागणी गेल्या बेचाळीस वर्षांपासून आहे. (Dhule Finally repair of pick up shed in bus stand at Songir)

मात्र प्रशासन व महामंडळाच्या दुर्लक्षामुळे व योग्य पाठपुरावा नसल्याने बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हात व पावसात उभे राहावे लागतेच पण इतर अनेक अडचणींनाही तोंड द्यावे लागते. सोनगीर हे ३० हजारांहून अधिक लोकवस्तीचे गाव असून, मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक तीन व सोनगीर-अंकलेश्वर राज्यमार्ग क्रमांक एकवर वसलेले आहे. परिसरात ३० ते ४० खेडी असून, त्यांचा येथे दैनंदिन संपर्क असतो.

शिवाय शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थ धुळ्याला ये-जा करतात. त्यामुळे येथील बसथांब्यावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. बसथांब्यावर खासगी वाहने, कालीपिली यांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे अन्य वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बसथांब्याच्या नावाला एक पिक-अप शेड असून, त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. (latest marthi news)

त्याचा प्रवाशांसाठी काहीच उपयोग नाही अशी स्थिती आहे. टोलप्लाझाने पिक-अप शेड बांधले; परंतु शेडखालून गटार जात असल्याने शेडच्या दोन्ही बाजूचे पाइप अलगद बसविले होते. वाऱ्यामुळे ते कोसळले. त्यामुळे अवघ्या नऊ वर्षांत ते पिक-अप शेडदेखील कुचकामी ठरले आहे.

‘सकाळ’ला धन्यवाद!

सध्या बसथांब्याजवळ विविध वाहने, विक्रेत्यांची गर्दीत प्रवासी हरवले आहेत. पिण्याचे पाणी, शौचालय, महिलांसाठी योग्य स्वच्छतागृहांचा अभाव आहेच. दरम्यान, वृत्त प्रसिद्ध होताच शुक्रवारी (ता. ५) दुपारी टोलप्लाझाचे कर्मचारी बसथांब्याजवळील पिक-अप शेडवर आले. दुपारी चारपर्यंत शेडच्या दोन्ही बाजूसह अन्य भाग दुरुस्त केला. त्यामुळे प्रवाशांना बसायला जागा प्राप्त झाली. प्रवाशांना दिलासा मिळून त्यांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT