Ratnabai Patil standing with truck blocked at border check post. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 60 किलो कांद्यासाठी 32 हजारांचा दंड..! रात्रभर वाहन थांबविले, काट्यात तफावतीचा संशय

Dhule News : आयशरमध्ये ६० किलो कांदा अधिक असल्याच्या कारणावरून वाहतूकदाराला ३२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : आयशरमध्ये ६० किलो कांदा अधिक असल्याच्या कारणावरून वाहतूकदाराला ३२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पैसे न भरल्याने वाहन रात्रभर उभे करून ठेवले. वाहतूकदाराने कांदा खराब होईल, मला सोडा, अशा विनवण्या केल्यानंतर २२ हजार रुपयांची दंड रक्कम आकारण्यात आली. (Dhule fine of 32 thousand rupees was imposed on transport due to excess of 60 kg of onions)

ही घटना ३ एप्रिलला हाडाखेड (ता. शिरपूर) येथील सीमा तपासणी नाक्यावर घडली. दरम्यान, नाक्यावरील वजनकाट्यात तफावत असल्याचा संशय संबंधिताने व्यक्त केला. शिरसाणे (ता. धुळे) येथील भारत रामचंद्र पाटील हा युवक मामा खेमराज कौतिक सैंदाणे यांच्या शेतातील कांदा विकण्यासाठी आयशर (एमएच १८, बीझेड ०२१२)मध्ये भरून इंदूर (मध्य प्रदेश) येथे घेऊन जात होता.

महामार्गावर हाडाखेड येथे सीमा तपासणी नाक्यावर मालाचे वजन १६ हजार ९६० किलो भरले. संबंधित वाहनाची भारमर्यादा १६ हजार ९०० किलो असून, तुमच्या वाहनात ६० किलो कांदा जास्त भरला, त्यामुळे ३२ हजार रुपये दंड भरावा लागेल, असे तेथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वाहनचालक आणि शेतकरी यांनी दंड भरण्यास नकार दिला.

त्यामुळे वाहन जमा करून रात्रभर नाक्यावर उभे ठेवण्यात आले. भारत पाटील यांच्यासह आई रत्नाबाई पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या विनवण्या केल्या. मात्र त्यांनी ऐकले नाही. कांदा खराब होईल, अशी भीती वाटल्याने अखेर तडजोडीसाठी पाटील मायलेक तयार झाले. अधिकाऱ्यांनी २२ हजार ५०० रुपये दंड त्यांच्या ऑनलाइन खात्यावर आकारून वाहन ताब्यात दिले. त्यानंतर कांदे घेऊन आयशर इंदूरकडे रवाना झाला. (latest marathi news)

वजनात तफावत

आयशर ३ एप्रिलला रात्री साडेबाराला नाक्यावर पोचला. त्या वेळी त्याचे वजन केले असता १६ हजार ९६० किलो भरले. दुसऱ्या दिवशी पुन्हा वजन केल्यानंतर १६ हजार ८४० किलो वजनाचा आकडा दाखविण्यात आला. त्यामुळे भारमर्यादेच्या आत असूनही दंड का आकारता, अशी विचारणा केल्यानंतर बिल भरावेच लागेल, असे सांगून दंडाच्या रकमेत तडजोड केल्याची माहिती भारत पाटील याने दिली.

नाका चर्चेत

यापूर्वीही वजनकाट्यावरील तफावतीमुळे या नाक्यावर अनेकदा वाद झाले आहेत. वाहतूकदार चालक-मालक संघटनेतर्फे मोठे आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र लहानसहान कारणांवरून वाहनचालकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरूच आहेत. विशेष म्हणजे याच नाक्याच्या मागून काहींनी शुल्क चुकविण्यासाठी खासगी रस्ता तयार केला असून.

तेथून अवजड वाहने बिनबोभाट धावत असतात. त्याविरोधात अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र शेतकऱ्यांच्या वाहनांना लक्ष्य केले जात असल्याचे विविध घटनांवरून दिसून आले आहे.

"माझे पती रामचंद्र पाटील भारतीय सैन्यदलातून निवृत्त झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. मुलास उपजीविकेचे साधन म्हणून कर्ज काढून आयशर ट्रक घेऊन दिला. ६० किलो कांद्यासाठी ३२ हजार रुपये दंड आकारला जात असेल तर शेतकरी आणि वाहतूकदार कसे जगणार?"- रत्नाबाई पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT