Bhimrao Panchale, Emperor of Ghazals presenting Shabdasurani Bhayatra program at the Mahasanskrit Mahotsav esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शब्दसुरांच्या भावयात्रेत रसिक मंत्रमुग्ध! धुळे महासंस्कृती महोत्सवाचा समारोप

Dhule : पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या समारोपाला गझलसम्राट भीमराव पांचाळे यांच्या शब्दसुरांच्या भावयात्रेत रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई जिल्हा प्रशासन, धुळे यांच्यातर्फे आयोजित पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या समारोपाला गझलसम्राट भीमराव पांचाळे यांच्या शब्दसुरांच्या भावयात्रेत रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. समारोप सत्राला मान्यवरांची उपस्थिती लाभली. येथील पोलिस कवायत मैदानावर पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव झाला. (Dhule five day Mahasanskruti Mahotsav concludes)

समारोप कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, गझलकार भीमराव पांचाळ आदी उपस्थित होते.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक कराळे यांनी ‘स्वातंत्र्याच्या अमृत साली, चला पेटवू पुन्हा मशाली...’ ही कविता सादर केली. उपस्थितांनी कवितेस भरभरून दाद दिली. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी प्रास्ताविक केले.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी आभार मानले. अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, संदीप पाटील.

मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर, तहसीलदार अरुण शेवाळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासह महसूल, पोलिस, मनपा, जिल्हा परिषदेसह इतर विविध विभागांचे अधिकारी व धुळेकर नागरिक उपस्थित होते. (latest marathi news)

पाच दिवस कार्यक्रमांची मेजवानी

पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची हास्यजत्रा, आयुष्यावर बोलू काही, वारी-सोहळा संतांचा, मोगरा फुलला, शब्दसुरांची भावयात्रा यासह स्थानिक कलाकारांनी आदिवासी नृत्य, शिवकालीन शस्त्र कलेचे सादरीकरण, शहनाई तबला जुगलबंदी, शाहिरी शिवगर्जना, खानदेशी लोककला आणि आहिराणी लोकगीत, मराठी अहिराणी गीतगायन व नृत्य.

भरतनाट्यम, काव्यमय संगीत कार्यक्रम, जात्यावरची गाणी, मारुतीची जत्रा बालनाट्य, शाहिरी जलसा, हिंदी मराठी गाण्याची संगीतमय मैफल, नाटिका, मलखांब, जगणं तुमचं आमचं काव्यवाचन व गायन मैफल, महाराष्ट्र दर्शन, अभंग, महाराष्ट्राची संतपरंपरा, लावणी.

अहिराणी नृत्य, दिव्यांग विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, बाहुल्यांचे विश्व कठपुतली कार्यक्रम, बेलसर स्वारी नाट्य, कविसंमेलन, अरे संसार संसार हा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित संगीत व नाट्यमय कार्यक्रमांचे सादरीकरण झाले.

तसेच शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, बचतगट उत्पादन, वस्त्र संस्कृती दालन, वन्यजीव व छायाचित्र प्रदर्शन, तसेच बचतगट उत्पादनांच्या दालनांनाही विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT