Flower Market esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Navratri Flower Rates: नवरात्रोत्सवात फुलांची दरवळ महागणार! झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा आतापासूनच खोतोय भाव

सकाळ वृत्तसेवा

Dhule Navratri Flower Rates : गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्र, दसरा व अन्य पूजाविधींसाठी, तसेच सजावटीसाठी फुलांची मागणी वाढते. मात्र, यंदा झे़ंडूसह इतर फुलांच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. गुलाब, शेवंती, मोगरा यंदा चांगलाच भाव खात आहे. नवरात्रोत्सवात फुलांची मागणी आणखी वाढणार असल्याने दरदेखील वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. (Flowers will expensive during Navratri Festival 2024)

नवरात्रीतील दहा दिवसांसह दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे महत्त्व अधिक असते. पूजेबरोबरच घराला तोरण हे झेंडूच्या फुलांचेच असते. वाहनांनाही झेंडूच्या फुलांचे हार घालत असतात. याच पार्श्वभूमीवर झेंडू उत्पादक शेतकरी हे दसऱ्याच्या तोंडावर फुले येतील, असे नियोजन करत असतात. याच काळात मात्र ठिकठिकाणी अतिवृष्टीदेखील झाली आहे.

परतीच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच दसऱ्याला लागणारी झेंडूची फुलेही बाजारात भाव खाण्याची शक्यता आहे. घटस्थापनेच्या आधी झेंडू ३० ते ४० रुपये किलोने विकला जात असला, तरी नवरात्रीत याच झेंडूला दुप्पट भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे. सहाजिकच दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुले ही किलोला शंभरी पार करतील, असा अंदाज आहे.

फुल बाजारात शेवंती, अ‍ॅस्टर सध्या १०० ते १२० रुपये किलो दराने विक्रीला उपलब्ध आहे. शहरातील फुलवाला चौक, संतोषीमाता चौकात २५० ते ३०० रुपये किलो दराने फुले विकली जात आहेत. शहरात सध्या कापडणे, देवभाने, नरडाणा, मालेगाव भागातून झेंडू, गुलाब, मोगरा, शेवंतीच्या फुलांची आवक होत आहे.

नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. सण, उत्सवांमुळे फुलांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे गत वर्षापेक्षा यंदाच्या किमतीमध्ये सात ते दहा टक्के वाढ झाली आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे, तर ऐन सणासुदीत फुलांच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना जरा विचार करूनच सजावट करावी लागणार असल्याचे ग्राहक सांगतात. (latest marathi news)

फुलांचे सर्वसाधारण दर

प्रकार.....................रुपये

मोगरा....................७५० ते ८०० रु. किलो

झेंडू पिवळा (क्रेट्स).....१५० ते २०० रु.

झेंडू केशरी (क्रेट्स)......१०० ते १४० रु.

शेवंती पिवळी............१३० ते १६० रु. किलो

शेवंती सफेद..............८० ते १०० रु. किलो

अ‍ॅस्टर....................१०० ते १२० रु. किलो

निशिगंध..................५० ते ६० रु. किलो

गुलाब....................१० ते ३० रु. जुडी

लिली बंडल..............१० ते २० रु. गड्डी

"परतीच्या पावसामुळे यंदा फुलांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांनी फुले बाजारात आणलेली नाहीत. नवरात्रीत आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यातही पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यामुळे फुलांचे दर चढेच राहील."

- राजू गवळे, फूलविक्रेता, धुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ, तुतारी हाती घेण्याचं बड्या नेत्यानं केलं निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

Badlapur School Crime: कोर्टानं कालच अटकपूर्व जामीन फेटाळला अन् आज शाळेच्या दोन्ही फरार विश्वस्तांना झाली अटक

Mohammad Shami: हात जोडून विनंती करतो...! मोहम्मद शमी संतापला, 'त्या' वृत्ताचा केला इन्कार

Pune Crime: पुण्यात भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT