Illegal liquor caught by the police. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime: कारेघाटच्या जंगलात मद्यतस्करांच्या आवळल्या मुसक्या! नवापूर पोलिसांची कारवाई; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News : ९ जुलैच्या रात्री नऊच्या सुमारास कारवाई केली असून, गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : तालुक्यातील कारेघाट गावाच्या जंगल परिसरातून लक्कडकोटमार्गे गुजरातमध्ये अवैध मद्यसाठा घेऊन जाणाऱ्यांना नवापूर पोलिसांनी पकडले. ९ जुलैच्या रात्री नऊच्या सुमारास कारवाई केली असून, गुन्हा दाखल केला आहे. (Dhule forest of Kareghat drunkards arrested Nawapur police action)

नवापूर पोलिसांना ९ जुलैला मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने काही व्यक्ती विदेशी दारू व बिअर खरेदी करून स्कूटी व मारुती स्विफ्ट मोटार या चारचाकी वाहनामध्ये भरून नवापूर तालुक्यातील कारेघाटच्या जंगलातून लक्कडकोटमार्गे गुजरातमध्ये घेऊन जाणार आहेत.

त्याअनुषंगाने नवापूर पोलिसपथकाने रात्री नऊला सुमारास कारेघाट जंगलात रस्त्यावर नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करताना स्कूटी (जीजे २६, एजी ८३२१)वर विपुल अजय गावित (वय २१), श्याम सुरेश गावित (२३, दोघे रा. लक्कडकोट, ता. नवापूर) हे २८ हजार १२० रुपये किमतीची विदेशी दारू व बिअर कापडी पिशव्यांमध्ये भरून अवैध वाहतूक करताना आढळले. त्यांच्याकडून ९८ हजार १२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध पोलिस अतुल परशराम पानपाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (latest marathi news)

दुसरी कारवाई

मारुती कंपनीच्या पांढऱ्या गाडी (जीजे २६, एई ०८३)च्या डिकीमध्ये व मागील सिटावर सुमारे ५३ हजार ७६० रुपये किमतीचे १६ नग खाकी रंगाच्या पृष्ठ्याच्या खोक्यामध्ये देशी दारूची अवैध वाहतूक करत असताना विपुल हंसराज गावित (२१, रा. लक्कडकोट, ता. नवापूर), गौरंगकुमार शैलेशभाई राठोड (२६, रा. उकाई रोड, सोनगड, ता. सोनगड, जि. तापी), विपुल ऊर्फ घोडा पाटील (रा. सोनगड, ता. सोनगड, जि. तापी) या तिघांकडे पाच लाख ५३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

त्यांच्याकडे देशी दारू खरेदी व वाहतूक परवान्याबाबत विचारपूस करता ते नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध पोलिस नाईक प्रेमचंद भोमा जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून नवापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला.

दोन्ही कारवाया नवापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस उपनिरीक्षक, मनोज पाटील, भाऊसाहेब लांडगे, हवालदार दिनेशकुमार सुभाषचंद्र वसुले, पोलिस नाईक प्रेमचंद जाधव, पोलिस शिपाई अतुल पानपाटील, किशोर वळवी यांच्या पथकाने केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT