Dhule News : पिंपळनेर (ता. साक्री) येथील ट्रेडिंग चालकाची येवल्यातील तिघांनी सुमारे अडीच लाखांत फसवणूक केली. कांद्याच्या ४१८ बॅगा घेऊन पैसे बुडविले. याप्रकरणी संशयितांवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पिंपळनेर येथील मानव केंद्राजवळील सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनीचे चालक हरिदास शिरसाट यांच्या फिर्यादीनुसार अमोल शंकर कदम. (Dhule Fraud Crime)
राहुल शंकर कदम व शंकरशेठ कदम (रा. दर्शन हॉटेलच्या पाठीमागे, मनमाड-येवला रोड, ता. येवला, जि. नाशिक) यांनी गोड बोलून कांद्याच्या ४१८ बॅग (प्रतिबॅग २५५.१५ किलोग्रॅम) घेतल्या. मात्र, त्यांच्याकडे कांद्याचे तीन लाख ५७ हजार २१० रुपये घेणे बाकी होते.
त्यापैकी ट्रॉलीचे वाहनभाडे ८५ हजार रुपये हे मालपोच करताना देण्याचे ठरले असल्याने त्यांनी भाड्याची रक्कम दिली. (latest marathi news)
तसेच हरिदास यांचा मुलगा वनराज शिरसाट याच्या बँक खात्यात २० व १५ हजार रुपये, असे दोनदा पाठविले. उर्वरित रक्कम आठ दिवसांत पाठवितो, असे सांगितले.
नंतर वारंवार मागणी करूनही बाकी असलेले दोन लाख ३७ हजार २१० रुपये बुडवून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.