The ongoing work of piling garbage through Poclean at the municipal waste depot on Varkhedi Road. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कचरा डेपोवर घंटागाड्यांना यंदा ‘नो प्रॉब्लेम’; जेसीबी, पोक्लेनद्वारे कचरा व्यवस्थित लावण्याचे काम

Dhule : महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोवर पावसाळ्यात वाहने फसून समस्या निर्माण होतात.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोवर पावसाळ्यात वाहने फसून समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेकडून डेपोवर उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातून रोज येणारा कचरा मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांमध्ये पडणार नाही यासाठी जेसीबी, पोक्लेनच्या साहाय्याने हा कचरा व्यवस्थित लावण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात कचरा टाकण्यासाठी समस्या येणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. शहरातून दररोज १०० ते ११० मेट्रिक टन कचरा संकलित करून तो महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोवर टाकला जातो. ( Garbage cart at Garbage Depot No Problem this year JCB work of arranging garbage properly by Poklen )

मोठ्या प्रमाणावर निघणाऱ्या या कचऱ्यामुळे डेपोही फुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळते. याचा परिणाम डेपोवर कचरा टाकायला जागा शिल्लक नसल्याचेही यापूर्वीचे चित्र होते. दरम्यान, आता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत बायोमायनिंहसह इतर विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे कचरा डेपो रिकामा होण्यास मदत होत आहे. असे असले तरी विशेषतः पावसाळ्यात डेपोवर कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या वाहनांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. पाऊस झाल्यानंतर घंटागाड्या, ट्रॅक्टर, डंपर आदी वाहने डेपोवर दूरपर्यंत जाऊ शकत नाही.

वाहने नेण्याचा प्रयत्न केला तर ते कचऱ्याच्या ढिगांवर फसतात. त्यामुळे घंटागाडीचालक मिळेल त्या जागेवर कचरा टाकून मोकळे होतात. त्यामुळे वरखेडीरोडच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग लागतात. याचा त्रास वरखेडी ग्रामस्थांसह परिसरातील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यामुळे अनेकदा आंदोलने, तक्रारी झाल्याचेही पाहायला मिळाले आहे. दरम्यान, यंदा अशा समस्या निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना होत आहेत. (latest marathi news)

जेसीबी, पोक्लेनद्वारे काम

कचरा डेपोवरील कचऱ्याचे ढीग व रोज येणारा कचऱ्याचे व्यवस्थित ढीग लागावेत, रस्त्यात ते पडून राहू नयेत यासाठी महापालिकेतर्फे यंदा जेसीबी, पोक्लेन मशिनचा वापर करण्यात येत आहे. भाडेतत्त्वावरील या वाहनांद्वारे साधारण गेल्या महिनाभरापासून डेपोवर काम सुरू आहे. यामुळे मुख्य रस्त्यासह डेपोतील अंतर्गत रस्तेही खुले झाल्याचे अधिकारी म्हणतात. त्यामुळे पाऊस झाला तरी कचरा घेऊन येणारी वाहने डेपोवर आतमध्ये जाऊन कचरा टाकू शकतात, असा दावाही अधिकारी करतात.

महापालिकेतर्फे यासाठी खर्चाचीही तरतूद केली आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील पोक्लेन, जेसीबीच्या माध्यमातून हे काम केल्याने समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. यंदा पावसाळ्यातही कचरा टाकण्यासाठी समस्या उद्भवणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे या कामावर लक्ष ठेवून आहेत.

नागरिकांकडून समाधान

वरखेडी रोडच्या दुतर्फा टाकलेला कचराही उचलून घेतल्याने यंदा वरखेडी रोडही मोकळा झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचा दैनंदिन वापर करणाऱ्या वरखेडी येथील नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनीही महापालिकेच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थात अद्याप संपूर्ण पावसाळा बाकी आहे. त्यामुळे या काळातही स्थिती कायम राहावी, अशी अपेक्षा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT