Kiran Patil, Zilla Parishad member of Kapdane group, while inspecting the foundation excavation and inspection in Panjra riverbed by Poklen machine. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : गेटेड बंधाऱ्याच्या कामाला न्याहळोद येथे सुरवात

Dhule : गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारा बांधकामाला नुकतीच शासकीय मान्यता मिळाली आहे. या बंधाऱ्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, पाया खोदण्याचे काम जोरात सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारा बांधकामाला नुकतीच शासकीय मान्यता मिळाली आहे. या बंधाऱ्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, पाया खोदण्याचे काम जोरात सुरू आहे. न्याहळोद परिसरातील जिव्हाळ्याचा विषय आईजोगाईलगत पांझरा नदीपात्रात १६ कोटी सात लाख साठ हजार ६०३ रुपये रुपयांच्या बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानंतर आता बंधाऱ्याचा पाया खोदकामास सुरवात करण्यात आली आहे. (Dhule Gated dam work begins at Nyahlod)

या कामामुळे गावालगतच्या सिंचनाचा प्रश्न व नदीपात्रात असलेल्या दहा ते बारा गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे; त्यात न्याहाळोदसह नगाव, धनूर, बिलाडी, सातारने, मोहाडी, कौठळ, तामसवाडी, विश्वनाथ, सुकवड आदी गावांना न्याहळोद नदीपात्रातूनच पाणीपुरवठा होत असतो. मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्राच्या पत्रानुसार गेटेड सिमेंट बंधारा योजनेत ९८ सघमी पाणीसाठा होणार असून, हजारो हेक्टर शेतीला याचा फायदा होणार आहे.

प्रकल्पासाठी अधीक्षक अभियंता व जलसंधारण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. परिसरात उन्हाळ्यात तीव्र पाण्याची टंचाई भासत असल्याने परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी होती. (latest marathi news)

परंतु गेटेड बंधाऱ्याचे काम मानदंडात बसत नसल्याने अनेक वेळा या कामाला स्थगिती मिळाली होती; परंतु मंत्रालयात चकरा मारून प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, कामाला गती मिळाली आहे. या कामाचे सूत्रधार कापडणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील यांना जाते.

न्याहळोद, तसेच नगावसह बारा ते तेरा गावांचा पाण्याचा प्रश्न जटिल असून, आजपर्यंत एवढा भरगच्च निधी गावाला मिळाला नव्हता. काम पूर्णत्वास झाल्यावर सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे; परंतु काम गुणवत्ता राखून व्हायला हवे. -दिलीपभाऊ उपाध्ये, गटप्रमुख, न्याहळोद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT