Dhule News : शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेतील पळासनेरसह आदिवासी गावपाड्यात भोंगऱ्या बाजाराची धूम सुरू आहे. नोकरी व रोजगारासाठी स्थलांतरित झालेली कुटुंबेही भोंगऱ्या, होळी, रंगपंचमी, मेलादा उत्सव साजरा करण्यासाठी गावी पोचली आहेत. त्यामुळे सातपुड्यातील आदिवासी गाव-पाडे गजबजले आहेत. पळासनेर (ता. शिरपूर) येथील भोंगऱ्या बाजार शनिवारी (ता. २३) भरविण्यात आला. हा परिसरातील सर्वांत मोठा भोंगऱ्या बाजार भरतो. (Dhule glimpse of culture with dance at Bhongra Bazar festival)
तो पाहण्यासाठी आदिवासी तरुणांत सकाळपासून प्रचंड उत्साह दिसून आला. बाजारात येण्यासाठी युवक-युवती विविध वेशभूषा करून आले होते. काही परिसरातील गाव-पाड्यातील हजारो आदिवासी बांधवांनी मोठ्या आकाराचे ढोल, मांदल, तिरकामठा, बासरी, काशाची गिरमी आदी वाद्यांच्या गजरात नृत्य करून संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन घडविले.
रस्त्याच्या दुतर्फा थाटली दुकाने
पळासनेर गावात आयोजित भोंगऱ्या उत्सवानिमित्त विक्रेतांना व्यवसाय करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत प्रांगणात व गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांनी त्यांची दुकाने थाटली होती. भोंगऱ्या बाजाराच्या दिवशी गावातील वातावरण उत्साही दिसून येत होते.
पारंपरिक नृत्याने वेधले लक्ष
भोंगऱ्या बाजारात बहुतांश तरुणाईने एकसारखे ड्रेस व पारंपरिक पोशाख परिधान केल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले. तरुण-तरुणी घोळका करीत ढोल-ताशांच्या गजरात नृत्याचा फेर धरीत एकच जल्लोष करीत असल्याचे दिसून आले. उत्सवात सहयोग सरपंच शीतल कोळी, उपसरपंच कैलास पावरा, ग्रामसेवक प्रकाश बोरसे, ग्रामपंचायत सदस्य छोटू कोळी. (latest marathi news)
माजी उपसरपंच राजू भिल, पोलिसपाटील वानसिंग पावरा, सुभाष शिंदे, योगेश माळी, भय्या राजपूत, रामा चारण, संजय गिराशे, सुरेश कोळी, शिवाजी चारण, काऱ्हाऱ्या पावरा, सुरत भिल, सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक रफिक मुल्ला, कृष्णा पावरा, हवालदार संतोष पाटील, भूषण पाटील, अनिल शिरसाठ, जयराम शिंदे, संदीप ठाकरे, कैलास पवार, सुनील पाठक, योगेश मोरे, मनोज पाटील, आदी कर्मचारी उपस्थित होते.
गर्दीने फुलला बाजार
पळासनेर महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरहद्दीवर असल्यामुळे भोंगऱ्या बाजार पाहण्यासाठी खास मध्य प्रदेश सरहद्दीवरील गावपाड्यातील डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी मंडळींनी हजेरी लावली होती.
परिसरातील गावांतून आलेल्या आदिवासी महिला व तरुणींनी वस्त्रालंकार तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली. पारंपरिक पद्धतीचे कपडे व दागदागिन्यांच्या दुकानासह लहान मुला-मुलींसाठी व स्वतःसाठी कपडे खरेदी करताना आदिवासी बांधव दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.