Dhule News : उन्हाळ्यात पारंपरिक पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली. ती आता आटोपली आहे. त्यासाठी ऐरवी विशेष उपयोगात येत नसलेल्या सुप, टोपल्या, परड्या आदी वस्तू खरेदीची महिला वर्गाकडून लगबग राहिली असल्याने पारंपरिक सूप, टोपल्या आदींना सुगीचे दिवस आल्याचे बाजारपेठेत दिसून आले. गृहिणींनी उन्हाळी कामांना अधिक प्राधान्य दिल्याने शहरातील विक्रेत्यांकडे लहान आकारातील टोपल्या सरासरी २० ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. (Dhule good days for bamboo baskets)
शहरासह परिसर व ग्रामीण भागात महिला वाढत्या उन्हाबरोबर पापड, वड्या, कुरडया, शेवाळ्या आदी पदार्थ बनविण्यात गुंततात. हे पदार्थ वाळत घालण्यासाठी सूप, मोठ्या आकाराच्या टोपल्या आदींची गरज भासते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात गहू, तुरी आदी पिके निघाल्यानंतर त्यातील मातीचे खडे एक-एक करून निवडून काढणे अनेकदा शक्य नसते.
अशा वेळी हे धान्य धुण्याशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी मोठ्या आकाराच्या टोपल्या, डालके, परड्या आदींची गरज भासते. हे धान्य अधिक असल्यास ग्रामीण भागात ते नदीवर किंवा ओढ्यावर धुण्यासाठी नेले जाते. अशा वेळी मोठ्या आकाराच्या टोपल्या उपयोगी ठरतात. (latest marathi news)
बांबूचे टोपले उपयोगी
या सर्व प्रकारांसाठी सध्या बांबूच्या टोपल्या, परड्या आदींची गरज भासत असल्याने त्यांची मागणी वाढली आहे. त्यानुसार सरगुंडे, पापड्या अशा वस्तू आवर्जून बनविल्या जातात. त्या वाळत घालण्यासाठी अशा प्रकारचे टोपले उपयोगी पडतात. तसेच हे पदार्थ आदल्या रात्री बनविले जातात.
मात्र, त्यांना जमिनीवर न ठेवता मोठ्या टोपल्यात कापडाने बांधून त्या वर अडकवून ठेवल्या जातात. या सर्वांसाठी बांबूचे टोपले अधिक उपयोगी पडतात. त्यासाठीच अशा वस्तूंना सुगीचे दिवस आहेत. मोठ्या आकाराच्या परड्या, टोपल्या, डालके शंभर रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत खरेदी केले जात आहेत. विविध रंगातील बांबूचे आकर्षक डालके, छोटी फूलवेचक टोपली आदी वस्तूंनाही महिला-तरुणींकडून मागणी आहे.
"बाजारात प्लास्टिकचे सूप उपलब्ध असले तरी बांबूच्या सुपालाच आजही पसंती दिली जात आहे. गृहिणींकडून परडींची मोठी मागणी असते. वेगवेगळ्या आकाराच्या परड्या बाजारात उपलब्ध आहेत. लहान आकाराची टोपली सरासरी २० ते ५० रुपये आणि मोठ्या आकाराच्या टोपल्या, डालके, परड्या १०० ते १५० रुपयांपर्यंत विक्रीला उपलब्ध आहेत. बांबूच्या टोपल्या, डालके, परड्या तयार करताना खूप मेहनत घ्यावी लागते."
-सियाराम सांडू मोरे, विक्रेते, बांबू गल्ली, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.