Dhule District Collector  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : हरणमाळ, नकाणे तलाव जम्बो कालव्याद्वारे भरा; माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हरणमाळ व नकाणे तलाव जेम्बो कालव्याद्वारे भरण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सद्यःस्थितीत साक्री तालुक्यातील मालनगाव व जामखेली मध्यम प्रकल्प भरले असून, अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा होण्यास सुरवात झाली आहे.

अक्कलपाडा धरणात कालवा सुरू करण्याएवढा पाणीसाठा झाल्यावर लगेच नकाणे व हरणमाळ तलाव भरण्यास सुरवात करण्यात यावी. हा पाणीसाठा सय्यदनगर कालवा-इरासनाला-चौगाव कालवा उडाणेनाला-उडाणे बंधारा-जम्बो कालवा (अक्कलपाडा उजवा कालवा)-उडाणे-१-उडाणे-२- गोताणे पाझर तलाव-हरणमाळ तलाव या मार्गाने भरावा.

त्यामुळे उडाणे, गोताणे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होऊन पाणीटंचाई होणार नाही. जम्बो कालव्याद्वारे हरणमाळ भरल्यानंतर हरणमाळ योजनेच्या सांडव्यावरून नकाणे तलावात जलसाठा होण्यास सुरवात होईल. नकाणे तलावाच्या परिसरातील दह्याने लघुपाट बंधारे योजना अद्याप न भरल्याने नकाणे तलावात अपेक्षित पाणीसाठा होण्यास अवकाश आहे.

नकाणे तलाव त्याच्या परिसरातील पाण्यानेच नेहमी भरत असतो. त्यास भरण्यासाठी जम्बो कालव्याने सांडव्याद्वारे लवकरात लवकर भरणे शक्‍य होईल, असे श्री. कदमबांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (latest marathi news)

तसे केल्यास पाणी वाया

पाटबंधारे विभाग हरणमाळ तलावाचे पाणी नकाणे तलावात सोडून कालव्याद्वारे भरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे नकाणे तलाव भरेल मात्र नकाणे तलावाच्या परिसरातून येणाऱ्या पाण्याने नकाणे तलाव भरल्यानंतर पाणी वाया जाईल व हरणमाळ तलाव कालव्याद्वारे १०० टक्के भरेलच याची शाश्वती नाही.

त्यामुळे आजघडीला हरणमाळ तलावातील ४२ टक्के पाणीसाठा तसाच ठेवून जम्बो कालव्याद्वारे तो पूर्ण भरावा व नंतर सांडव्याद्वारे नकाणे तलावात पाणी टाकावे. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारे हे मुख्य जलस्रोत असल्याने ते पूर्ण क्षमतेने भरल्यास धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यास मोठी मदत होईल व भविष्यातील पाणीटंचाईपासून मुक्तता मिळेल. त्यामुळे यादृष्टीने पाटबंधारे विभागाला याबाबत आदेश निर्गमित करावा, अशी मागणी श्री. कदमबांडे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT