चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यात रविवारी (ता. १४) रात्री दहाच्या सुमारास काही महसूल मंडळांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. विखरण महसूल मंडळात सर्वांत जास्त म्हणजे ७१ मिलिमीटर, तर सर्वांत कमी दोंडाईचा महसूल मंडळात पाच मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. खलाणे व चिलाणे येथे प्रत्येकी एक मातीचे घरे पडले आहे. तालुक्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही. (Dhule Heavy rains in Shindkheda)
तालुक्यात रविवारी दिवसभर उकाळा जाणवत होता. मात्र रात्री दहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पावसात खलाणे येथील फकिरा विठोबा पवार व चिलाणे येथील दरबारसिंह बिजेसिंह गिरासे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचे तलाठ्यांनी पंचनाम्यात म्हटले आहे.
आतापर्यंत विखरण महसूल मंडळात एकूण ३११ मिलिमीटर, तर विरदेल महसूल मंडळात फक्त ४८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे कापूस, मका, बाजरी, मूग आदी पिकांना अंतर्गत मशागतीसाठी चांगला पाऊस झाला आहे. आता नदी व नाले वाहून निघण्यासाठी मुसळधारेची गरज आहे. (latest marathi news)
रविवारी महसूल मंडळनिहाय झालेला पाऊस (कंसात एकूण पाऊस)
शिंदखेडा : ६३ (२५५ मिलिमीटर)
नरडाणा : ४८ (२३७)
खलाणे : ५७ (२८०)
चिमठाणे : ४३ (२८५)
वर्शी : ०६ (२४६)
बेटावद : ०९ (१९५)
विरदेल : ०७ (४८)
दोंडाईचा : ०५ (१२६)
विखरण : ७१ (३११)
शेवाडे : २० (२८३)
------------------------------------
एकूण ३२९ २,२६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.