Mumbai-Agra Highway dug between Songir to Babhale Phata. In the second photo, the injured youth. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सोनगीर येथे खोदलेला महामार्ग जीवघेणा! महामार्गाच्या त्वरित दुरुस्तीची प्रवाशांची मागणी

Dhule News : मुंबई-आग्रा महामार्गाच्या वाघाडी फाटा ते बाभळे फाटादरम्यान काही ठिकाणी महामार्ग कोरून ठेवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : मुंबई-आग्रा महामार्गाच्या वाघाडी फाटा ते बाभळे फाटादरम्यान काही ठिकाणी महामार्ग कोरून ठेवला आहे. दीड महिना होऊनही टोलप्लाझा व महामार्ग प्राधिकरण विभागाच्या दुर्लक्षामुळे त्याची दुरुस्ती होत नाही. उखडलेल्या मार्गावर दुचाकी चालविणे कठीण असल्याने दररोज अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्वरित महामार्गाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी आहे. सोनगीर ते बाभळे फाटादरम्यान महामार्ग दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदाराने ठिकठिकाणी मार्ग उखडून ठेवला आहे. (Dhule Highway dug in Songir is fatal)

लवकर दुरुस्त होत नसल्याने वाहनधारकांना विशेषतः दुचाकीस्वारांना उखडलेला भाग अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे. दुचाकी घसरून अपघातांचे प्रमाण दररोज सरासरी एक झाले आहे. शुक्रवारी डांगुर्णे (ता. शिंदखेडा) येथील अधिकराव जयराम पाटील दुचाकीसह घसरून पडले. मागे बसलेला त्यांचा मुलगा निखिल अधिकराव पाटील (वय १७) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. धुळ्यातील ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे या मार्गाने जात असताना त्यांच्या पुढील दुचाकीस्वार घसरून जखमी झाला. श्री. लांडगे यांनी त्याला सावरले.

पाणी व प्राथमिक उपचाराची व्यवस्था केली आणि उखडलेल्या मार्ग दुरुस्तीबाबत आवाज उठविण्याचे आवाहन केले. उखडलेला मार्ग ताबडतोब दुरुस्तीसह डांबरीकरण करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

SCROLL FOR NEXT