Area under horticultural cotton in Kharif season. (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिंदखेड्यात फक्त 921 हेक्टरवरील शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी मदत

Dhule News : राज्यात या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ४० तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या तालुक्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : राज्यात या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ४० तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या तालुक्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असताना महसूल व कृषी विभागाने फक्त ९२१ हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी अनुदान मिळणार आहे. (Dhule Horticultural drought relief to farmers on only 921 hectares in Sindkheda)

बागायत शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्यात या वर्षी ४० तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळी तालुक्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.

तालुक्यातील एकूण ८१ हजार २५४ शेतकऱ्यांचे ९८ हजार ८७७ हेक्टर खरीप हंगामात पिकांची लागवड व पेरणी करण्यात आली होती. ८६ कोटी ४७ लाख ९० हजार रुपये राज्य शासनाने दुष्काळी अनुदान मंजूर केले आहे.

बागायत क्षेत्र जास्त, मात्र दुष्काळ मदत तोकडी

तालुक्यात खरीप बागायती कापूस १९ हजार ५११ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. मात्र दुष्काळी अनुदान म्हणून फक्त ९२१ हेक्टरसाठी मदत मंजूर करण्यात आली. हजारो हेक्टर बागायत असताना महसूल व कृषी विभागाने कमी क्षेत्र मंजूर केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (latest marathi news)

‘केवायसी’ची साइट बंद

शासनाने दुष्काळी अनुदानासाठी मदत व पुनर्वसन विभाग नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत आधार प्रमाणीकरण (केवायसी) करणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून साइट बंद असल्याने शेतकरी व महिला शेतकरी यांना ई-सेवा केंद्रावर चकरा माराव्या लागत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी व मोठी गावे येथे ई-सेवा केंद्र असल्याने शेतकऱ्यांना ये-जा करावी लागत असल्याने आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे.

"खरीप हंगामात तीन एकर क्षेत्रावर २२ मेस बागायती कापूस लागवड केली होती. यंदा दुष्काळ असल्याने कापसाचे उत्पादन आले नाही. शासनाने दुष्काळी मदत देताना जिरायत क्षेत्राची मदत मिळणार आहे. मात्र प्रत्यक्षात बागायती कापूस लागवड केली होती. जिरायत कापसाची तोकडी मदत मिळाल्याने ‘दुष्काळात तेरा महिना’ अशी शेतकऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे." -राजेंद्रसिंह गिरासे, शेतकरी, वरसूस, ता. शिंदखेडा

खरीप २०२३ हंगामातील दुष्काळी अनुदान

क्षेत्राचा प्रकार बाधित शेतकरी एकूण क्षेत्र अनुदान (लाख)

जिरायत - ७९,५४४ -९६,५०४.६८ - ८,२०२.९०

बागायत - ९२१ - १,६१८.०९ - २७५.२१

फळबाग - ७८९ - ७५४.१८ - १६९.६९

---------------------------------------------------------------------

एकूण - ८१,२५४ - ९,८८,७७.७७ - ८,६४७.९०

--------------------------------‐‐---------------‐---------------

हेक्टरी अर्थिक मदत

जिरायत - ८,५००/-

बागायत - १७,५००/-

फळबाग - २२,५००/-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT