Temple Chief Trustee Somnath Gurav, Shekhar Wagh, Chief Sanitation Inspector Rajesh Vasave, Sanitation Inspector Chandrakant Jadhav, Mahendra Thackeray etc. were present at the launch of the Humanity Wall initiative in Sri Ekvira Devi Temple area. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : एकवीरादेवी मंदिर परिसरात माणुसकीची भिंत; महापालिकेतर्फे उपक्रम

Dhule News : रिसायकल (RRR) घटकांतर्गत धुळे महापालिकेतर्फे शहरातील श्री एकवीरादेवी मंदिर परिसरात माणुसकीची भिंत उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : स्वच्छता ही सेवा-२०२४ अभियान व रिड्यूस, रियूज, रिसायकल (RRR) घटकांतर्गत धुळे महापालिकेतर्फे शहरातील श्री एकवीरादेवी मंदिर परिसरात माणुसकीची भिंत उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी दैनंदिन वापरातील जुन्या पण वापरायोग्य वस्तू केंद्रावर जमा करायच्या आहेत. गरजू व्यक्ती आवश्‍यक त्या वस्तू तेथून घेऊन त्यांचा वापर करू शकतील. धुळे महापालिकेतर्फे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ या थीमवर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ दरम्यान स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. (Humanity wall in Ekvira Devi Temple is an initiative by Municipal Corporation)

यात स्वच्छता, वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. सोमवारी (ता. २३) श्री एकवीरादेवी मंदिर परिसरात आरआरआर घटकांतर्गत मंदिराचे मुख्य विश्‍वस्त सोमनाथ गुरव यांच्याहस्ते उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी शेखर वाघ, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, मलेरिया पर्यवेक्षक तथा स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. श्री. जाधव यांनी या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या दैनंदिन वापरातील जुन्या वस्तू (कपडे, चप्पल आदी) केंद्रावर जमा कराव्यात, जेणेकरून गरजवंत त्या वस्तूंचा वापर करू शकतील, असे आवाहन केले.

स्वच्छता निरीक्षक महेंद्र ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी मुख्य स्वच्छता निरीक्षक वसावे, लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक जाधव, विकास साळवे, ठाकरे, शहर समन्वयक जुनेद अन्सारी, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रकल्प अधिकारी घनश्याम जाधव, सिद्धांत जकातदार आदींनी परिश्रम घेतले. मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे- पाटील, उपायुक्त तथा नोडल अधिकारी हेमंत निकम, सहाय्यक आयुक्त तथा सहाय्यक नोडल अधिकारी प्रांजली मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. (latest marathi news)

यापूर्वी प्रतिसाद नाही

धुळे महापालिकेतर्फे यापूर्वीही शहरातील क्यूमाईन क्लब येथे माणुसकीची भिंत उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. आता एकवीरादेवी मंदिर परिसरात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. मंदिरात येणारे भाविक व इतर नागरिक आपल्याकडील जुन्या वस्तू येथे देतील. तसेच मंदिराच्या परिसरात येणारे गरजू व्यक्तींना त्यांचा वापर करता येईल, अशी अपेक्षा आहे.

जुन्या वस्तू भंगारात देऊन त्यातून थोडेफार पैसे मिळतात, त्यामुळे नागरिक वापरायोग्य जुन्या वस्तू सहसा देत नाहीत. शिवाय भंगार व्यवसाय करणारेही धुळ्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या उपक्रमाला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. अनेकदा अशा केंद्रांवर काही नागरिक वस्तू जमा करतात; पण नंतर तेथे त्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. परिणामी, घाण, कचरा होतो. त्यामुळे आता नव्याने सुरू केलेल्या केंद्राला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT