Gold Silver Rate esakal
उत्तर महाराष्ट्र

Gold-Silver Price : 8 दिवसांत सोने 5, तर चांदीत 11 हजारांची घसरण! कस्टम ड्युटी कमी केल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी केल्याच्या घोषणेनंतर या मौल्यवान धातूंचे भाव कमी होत असून शुक्रवारी (ता. २७) स्थानिक सराफा बाजारात २४ कॅरेट सोने ६८ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर, तर चांदी ८२ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली. गेल्या आठ दिवसांत सोने पाच हजार, तर चांदी ११ हजारांनी घसरली आहे. (Gold-Silver Price)

केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याची घोषणा झाली. नंतर २३ जुलैपासून भाव कमी होण्यास सुरवात झाली. २५ जुलैला सोने ७०० रुपयांनी घसरले व २६ जुलैला पुन्हा ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ते ६८ हजार ९०० रुपये प्रतितोळ्यावर आले. शनिवारी (ता. २७) ते याच भावावर स्थिर होते.

मात्र, गेल्या आठवडाभरातील स्थिती पाहिली, तर १८ जुलैला सोने ७४ हजार ५०० रुपयांवर होते. नंतर तीन दिवस थोडीफार घसरण होत होती. मात्र, अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून अधिकच घसरण वाढली व आठ दिवसांत सोने ७४ हजार ५०० रुपयांवरून शुक्रवारी ६८ हजार ९०० रुपयांवर आले.

घौडदौड काहीशी थांबली

चांदीच्याही भावात २६ जुलैला थेट साडेतीन हजारांची घसरण होऊन ती ८२ हजार ७०० रुपयांवर आली. १८ जुलैला चांदी ९३ हजार रुपये प्रति किलोवर होती, आठ दिवसांत ११ हजार रुपयांची घसरण होऊन ती ८२ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली आहे. यापूर्वी चांदी ६ मेस ८१ हजार ६०० रुपयांवर होती. (latest marathi news)

मात्र, ७ मेस त्यात एक हजार १०० रुपयांची वाढ होऊन ती ८२ हजार ७०० रुपयांवर पोचली होती. आता अडीच महिन्यांनंतर ती पुन्हा ८२ हजारांवर आली आहे. तथापि, मागील काही दिवसांपासून सोने व चांदीने सुरू केलेली घोडदौड काहीअंशी थांबली आहे.

चांदीत तर पडझड

मागील काही दिवसांपासून सोने व चांदीमध्ये आलेल्या तेजीला ब्रेक लागल्याने या उत्साहात आणखी भर पडल्याचे पाहावयास मिळाले. चांदीत तर मोठी पडझड झाली. गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. चांदीचे दर ९४ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचले होते. मात्र, मागील दोन दिवसांत चांदीच्या दरात तब्बल तीन हजार रुपयांची घसरण दिसून आली आहे. सध्या चांदी ८२ हजार ७०० रुपयांवर गेली आहे.

प्रथमच दरात घसरण

पावसाळ्याच्या दिवसांत सोने-चांदी खरेदी-विक्रीसाठी ‘स्लॅक सिझन’ मानले जात असले तरी यंदा मात्र २३ जुलैपर्यंत सराफा बाजार तेजीत होता. २३ जुलैला केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात केल्याने दुपारनंतर भाव गडगडले. २४ जुलैला २४ कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव ६९ हजार ६०० रुपये तर चांदीचा प्रतिकिलो भाव ८६ हजार रुपये होते. यामध्ये तीन टक्के जीएसटीचा समावेश नाही. सीमा शुल्कात कपात करण्यात आल्याने गत पाच महिन्यांत प्रथमच सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

गृहिणी वर्गात आनंद

जानेवारी २०२३ मध्ये सोन्याला प्रतितोळा सरासरी ५६ हजार रुपये दर होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रतितोळा ६२ हजार ९०० रुपये भाव होते. २० एप्रिलला ७४ हजार रुपये, मे महिन्यात ७२ हजार, जून महिन्यात ७२ हजार रुपये प्रतितोळा भाव होता. १३ जुलैला ७२ हजार ८०० रुपये तर २४ जुलैला ६९ हजार ६०० रुपये भाव होता.

मार्च ते १३ जुलै या कालावधीत चांदीच्या दरात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून आले. २० एप्रिलला चांदीला प्रतिकिलो ८४ हजार रुपये भाव होता. मध्यंतरी चांदीने ९५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. गेल्या दहा दिवसांत ११ हजारांनी घसरण झाली आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र सरकारने सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे गृहिणीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.

सोने-चांदीचे भाव उतरले

मार्च महिन्यापासून तेजीत असलेल्या सोने-चांदीचे दर अखेर सीमा शुल्क कमी केल्यानंतर २४ जुलैला चांगलेच घसरले. गेल्या १० दिवसांच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याचे भाव तीन ते चार हजारांनी कमी झाल्याने दागिने बनविणे सोपे झाले आहे. २०२४ मध्ये जानेवारी महिन्यापासून स्थानिक सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होता.

मार्च महिन्यापासून मात्र सातत्याने तेजी होती. सोने, चांदीच्या दराने एप्रिलच्या पंधरवड्यापर्यंत विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारली होती. मे व जून महिन्यातही सोने-चांदीच्या दरात तेजी दिसून आली. सोन्यापेक्षा चांदीच्या दरात अधिकच वाढ असल्याचे पहावयास मिळाले होते.

"गेल्या वर्षभरापासून दर कमी होतील या आशेने सोने खरेदी केले नव्हते. केंद्र सरकारच्या घोषणेमुळे सोन्याच्या दरात चांगलीच घट झाली आहे. महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसते आहे. आजच आम्ही सोन्याची खरेदी करणार आहोत." - पुष्पांजली पाटील, गृहिणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

Latest Marathi News Updates : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात तीन शाळकरी मुलांच्या हत्येचा प्रयत्न; एकजण ताब्यात

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

SCROLL FOR NEXT