Dhule News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे शनिवारी (ता. २०) मध्यरात्री सर्वांत मोठे ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबविण्यात आले. त्यात तब्बल ७२ हिस्ट्रिशीटर आणि हद्दपार ७२ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. नाकाबंदीत ३५५ वाहनांची तपासणी करीत १५ हजारांचा दंड वसूल झाला. (Dhule in Operation All Out Gavthi weapons and sword captured)
शिवाय गुन्हेगारांकडून दोन गावठी कट्टे, सहा तलवारी, खंजीर हस्तगत करण्यात आले. या माध्यमातून ऑपरेशन ऑल आउटला यश मिळाल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहाण्यासाठी मुख्य भागांसह मिश्रवस्तीत पोलिस अधिकारी.
अंमलदारांचा रूट मार्च घेण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्यासह शहर विभागातील पोलिस ठाण्यांचे २५ प्रभारी अधिकारी व दीडशे अंमलदार सहभागी झाले.
ऑपरेशन ऑल आउट
ऑपरेशन ऑल आउटमध्ये पोलिस अधीक्षक धिवरे, अपर पोलिस अधीक्षक काळे सहभागी झाले. तसेच जिल्ह्यातील ४५ अधिकारी, १७० अंमलदारानी धुळे शहरातील मोगलाई परिसर, मिल परिसर, गिंदोडिया चौक, एकता चौक, दंडेवालाबाबानगर (मोहाडी), गुजराती कॉम्प्लेक्स (शिरपूर), भराड गल्ली (साक्री), धावडे फाटा, नंदुरबार चौफुली (दोंडाईचा) व इतर ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविले गेले.
गुन्हेगारांवर कारवाई
ऑपरेशन ऑल आउटदरम्यान गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. यात नागेश ऊर्फ सोन्या पंडित कोळी (वय ३१, रा. आमोदे, ता. शिरपूर) व अजय ज्ञानेश्वर वाडिले (वय ३१, रा. भीमनगर, साक्री रोड, धुळे) याच्यावर कारवाई झाली. तलवारी बाळगणाऱ्या सात जणांकडून सहा तलवारी व एक खंजीर हस्तगत करण्यात आला.
दारूअड्डे मोडीत
चार ठिकाणच्या जुगारअड्ड्यांवर कारवाई झाली. यात एकूण ९१ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गावठी दारूनिर्मितीचे ११ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे दाखल करून ६३ जणांना वॉरंटची बजावणी करण्यात आली.
उमरपाडा (सुरत) ग्रामीण पोलिसांत दाखल गुन्ह्यातील वाँटेड आरोपी नाशिर शाह हनिफ शाह हकीम यास ताब्यात घेऊन गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक आरोपी रहेमुल्लाह मकबुल हुसेन यास शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली. हिस्ट्रिशीटर व हद्दपार ७२ जणांच्या राहत्या घरी तपासणी करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले.
उडी घेणारा वृद्ध दवाखान्यात
विविध कलमांन्वये २४ जणांवर, दोन जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, नाकाबंदीत ३५५ वाहनांच्या कसून तपासणीत पंधरा हजारावर दंड वसूल झाला. ड्रंक ॲन्ड ड्राइव्हच्या केसेस करण्यात आल्या.
ऑपरेशन ऑल आउटवेळी वरखेडी रोड परिसरात ६५ वर्षीय वृद्धाने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतल्याची माहिती डायल ११२ ने पोलिस यंत्रणेला प्राप्त झाली. आझादनगर पोलिस ठाण्याचे हवालदार पाटील व घुगे यांनी तत्काळ मदत करत संबंधित वृद्धास उपचारार्थ दवाखान्यात दाखल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक धिवरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.