Revenue employees protesting on Monday for various demands. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंद! कार्यालयात शुकशुकाट; दैनंदिन कामाला फटका

Dhule News : महसूल साहाय्यक, तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अर्हताधारी असताना महसूल साहाय्यक यांचा ग्रेड-पे एक हजार ९०० व तलाठी यांचा ग्रेड दोन हजार ४०० आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (ता. १५) बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे. त्याचा फटका रेशनकार्डावरील नाव कमी करणे, वाढविणे, दुरुस्ती करणे, उत्पन्नाचे दाखले आदी दैनंदिन कामांना बसला. तथापि, बंदमुळे महसूल कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून महसूल कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद केला. याआधी काळ्याफिती, निदर्शने, लेखणीबंद आंदोलन झाले होते. (Indefinite strike of revenue employees marathi news)

महसूल आकृतिबंध समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा, मराठवाडा विभागातील अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातील नायब तहसीलदारपदी तत्काळ पदोन्नती द्यावी.

महसूल विभागाचा आकृतिबंध त्वरित लागू करावा, नायब तहसीलदार संवर्ग असूनही वेतन श्रेणी वर्ग-तीन संवर्गाची देण्यात आली आहे, ती बदल करून चार हजार ८०० रुपये करावी. कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करावा. (latest marathi news)

महसूल साहाय्यक, तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अर्हताधारी असताना महसूल साहाय्यक यांचा ग्रेड-पे एक हजार ९०० व तलाठी यांचा ग्रेड दोन हजार ४०० आहे. त्यामुळे महसूल साहाय्यकांचा ग्रेड पे दोन हजार ४०० करावा आदी मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर आहेत.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाईकराव, कार्याध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष किशोरी हरणे, सरचिटणीस योगेश जिरे, कोशाध्यक्ष उमेश नाशिककर, जिल्हा संघटक महेश वाडिले, अभय कुलकर्णी, युवराज केदार, रोहिदास कोळी, दीपक महाले, जयंत पाटील, भटू बोरसे, गंगेश्वर गवळी, संजय सोनवणे, कुंदन चव्हाण, संतोष चौधरी, नीलेश मोरे, मोसीम पिंजारी, सुभाष गिरी, विद्या साळवे, एस. बी. बहिरम, कबीरदास सरकुंडे, चैत्रास सासके, महादेव पवार आदी आंदोलनात सहभागी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT