Farmer Jitendra Girase's cotton crop has been affected by the late blight disease. In the second photo, a pink bollworm found in a cotton crop. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Cotton : कापसावर लाल्या-गुलाबीचा प्रादुर्भाव; शिंदखेड्यात 71 हजार 500 हेक्टर क्षेत्रावरील पीक धोक्यात

Dhule Cotton : शिंदखेडा तालुक्यात यंदा पावसाची मेहेरनजर असल्याने खरीप हंगामातील पिके डोलू लागली होती.

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यात यंदा पावसाची मेहेरनजर असल्याने खरीप हंगामातील पिके डोलू लागली होती. तालुक्यात नगदी पीक म्हणून कापसाची ७१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बागायती व जिरायती लागवड करण्यात आली आहे. कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असताना, लगेच बागायती कापसाची वेचणी सुरू असल्याने कापसात गुलाबी बोंडअळी आढळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शिंदखेडा तालुक्यात सतत गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ परिस्थिती होती. (Infestation of Lal Ya Gulabi on cotton threatens crop of 71 thousand 500 hectares in Shindkheda )

यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून मॉन्सूनची मेहेरनजर असल्याने तालुक्यात मृग नक्षत्रात कापूस, मका पिकांची लागवड व बाजरी, मूग, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची पेरणी करण्यात आली होती. मृगाचे पीक जास्त पावसामुळे वाया गेले, तर काही ठिकाणी कापूस व मका पिकांतील शेतात जास्त पावसामुळे पाणी साचल्याने पिके पिवळे पडल्याने वाया गेले होते.

लाल्या-गुलाबी बोंडअळीचा हल्ला

शिंदखेडा तालुक्यात बागायती व जिरायती कापूस पिकाची ७१ हजार ५०० हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. गेल्या महिन्यात लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आता बागायती कापूस वेचणीच्या वेळी गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर हल्ला दिसून आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा चांगला मॉन्सून होऊनही शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला आहे. (latest marathi news)

कृषी विभागाने उपाययोजना कराव्यात

तालुक्यातील कापूस पिकावर लाल्या रोगासह गुलाबी बोंडअळीचा होत असलेल्या प्रादुर्भावबाबत कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी बांधावर जाऊन उपाययोजना कराव्यात. जिरायती कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने काहीतरी उपाययोजना करून मोफत कीटकनाशक उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

''खरीप बागायती कापूस पिकाची वेचणी सुरू असल्याने कापसात गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. यंदा बोंडअळीचा व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव लवकर झाल्याने कापसाच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ केंद्र व राज्य सरकारने मिळून द्यावा.''- जितेंद्रसिंह गिरासे, शेतकरी, चिमठाणे (ता. शिंदखेडा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT