Onion esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Onion: बाजार समितीत 46 हजार क्विंटल कांद्याची आवक! आठवडाभरातील स्थिती; दरात वाढीने शेतकऱ्यांना समाधान, ग्राहकांना फटका

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील बाजार समितीत सध्या लाल कांद्याची आवक वाढल्याचे चित्र आहे. मागील आठवडाभरात बाजार समितीत सुमारे ४६ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. शनिवारी (ता.२९) चार हजार ६०७ क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळ्यात पडलेले कांद्याचे दरही सध्या वाढले आहेत.

सर्वसाधारण कमाल दर दोन हजार २२५ रुपये राहिला. कांद्याला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना समाधान आहे. दुसरीकडे मात्र किरकोळ बाजारात कांदा ३० ते ४० किलो दराने विकला जात असल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. (Dhule Inflow of 46 thousand quintals of onion in market committee)

शनिवारी (ता.२९) कृषी बाजार समितीत लाल कांद्याला लिलावात क्विंटलमागे दोन हजार ७०० रुपयांचा दर मिळाला. दरवाढीमुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी वाढत्या उष्म्याने कहर केला होता. त्यात शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला. त्यामुळे सध्या भाववाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळले होते.

त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. त्यात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर निर्यातबंदी उठविल्याच्या घोषणेनंतर दरात काहीशी सुधारणा झाली. २१ जूनला बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजारांवर रुपये भाव मिळाला. सध्या दोन हजार ७०० ते दोन हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान कांद्याला भाव मिळत आहे.

शेतकऱ्यांना समाधान

शेतकऱ्यांना नेहमीच रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडे समाधान देऊन जात आहे. कांद्याच्या वाढत्या दरामुळे सामान्य ग्राहकांना मात्र आर्थिक फटका बसत आहे. बाजारात कांद्याचे दर ४०-५० टक्क्यांनी वाढले आहेत. शंभर रुपयाला पाच किलो अर्थात २० रुपये किलो मिळणारा कांदा आता शंभर रुपयाला तीन किलो किंवा कांद्याच्या प्रतवारीनुसार ३०, ३५, ४० रुपये किलो दराने विकला जात आहे.

त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मागणीच्या तुलनेत कांदा कमी पडत असल्याने कांदा टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे. जून महिन्याच्या सुरवातीपासून बाजारात येणारा हा कांदा साठवलेला आहे. (latest marathi news)

कांद्याची आवक-दर असे (दर प्रतिक्विंटल रुपयांत)

तारीख...आवक...सर्वसाधारण दर...सर्वाधिक दर...कमीत कमी दर

२१ जून...६,८९८...२,६६३...३,००५...९५०

२२ जून...४,९५९...२,४३३...२,८०३...८८३

२४ जून...६,८८५...२,४२५...२,७८०...१,०७५

२५ जून...८,८४६...२,४१३...२,७३३...९५०

२६ जून...५,२४९...२,५१७...२,८८३...१,०१०

२७ जून...४,२१६...२,४७८...२,७००...१,२०३

२८ जून...४,६२८...२,५००...२,८००...१,१२५

२९ जून...४,६०७...२,५२५...२,७००...९५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT