Shiv Sena (Shinde) protestor while complaining to Deputy Commissioner esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी चिमुरडीचा मृत्यू; महापालिका अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. यासंदर्भात वर्षभरापासून तक्रारी होऊनही महापालिकेचे अधिकारी उदासीन आहेत. अशात मोकाट कुत्र्यांच्या टोळीने एक वर्षीय बालिकेचे लचके तोडत तिला ठार केले. या घटनेमुळे धुळेकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी संतप्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेनेने (शिंदे) महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून त्यांनी आठवड्यात मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न सोडविला नाही तर त्यांच्या दालनात मोकाट कुत्रे सोडू, तसेच आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी शासनावर दबाव आणू, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ( Injured girl dies in dog attack )

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपमहानगरप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, भरत मोरे, कैलास मराठे, महादू गवळी, कपिल लिंगायत, आनंद जावडेकर, भटू गवळी, शिवाजी शिरसाळे, विष्णू जावडेकर, संदीप चौधरी, सागर निकम, राजेश पाटील, प्रवीण साळवे, नितीन जडे, शत्रुघ्न तावडे, छोटू माळी, तेजस सपकाळे आदींनी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. त्याचा आशय असा

किती बळी घेणार?

महापालिकेने शहरातील मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा. आणखी किती बळी गेल्यानंतर मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाईल? मोकाट कुत्र्यांनी लचके तोडलेल्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी मनपा आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. यापूर्वी देवपूरमधील सदाशिवनगरात पाच बालकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. गेल्या महिन्यात शहरात १७२ ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या नोंदी आहेत.

रात्री-अपरात्री धोका

शहरात चौफेर, तसेच कॉलन्यांमध्ये मोकाट कुत्रे वाढले आहेत. रात्री- अपरात्री एकट्या- दुकट्या व्यक्तीवर किंवा दुचाकीस्वारांवर कुत्रे हल्ला करीत असल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत वारंवार महापालिकेला निवेदन देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झालेला नाही. महापालिका उपाययोजनांचे पाऊल उचलण्यास तयार नाही. नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासंदर्भात वेळोवेळी मागणी करूनही परिणाम दिसला नाही. निविदा मंजूर होऊनही कंत्राटदाराकडून हे काम करून घेतलेले नाही. या कामात गैरप्रकार झाल्याचा संशय आहे.

महापालिकेवर आरोप

मनपामध्ये फक्त टक्केवारी दिलेल्या ठेकेदार-पुरवठादारांची बिले काढणे, कागदोपत्री काल्पनिक, बोगस कामांच्या निविदा काढणे, रात्री-बेरात्री मनपात बिलांच्या फाइल मंजुरीस वेळ मिळतो. मात्र, नागरिकांच्या जिवाशी आलेला मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न सोडवायचा नाही. या प्रकरणी महापालिका उदासीन असल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. मनपास योग्य ते आदेश करावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली.

शहरात जीव धोक्यात

शिवसेना (शिंदे) महानगरप्रमुख संजय वाल्हे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, अरविंद शेळके, पवन शिंदे, संजय कुसळकर, हाजी असीम कुरेशी, दादाजी महाले, दत्तात्रय माळोदे, गणेश चौधरी, किरण आगलावे, विजय झोटे, बबलू श्रीखंडे, बंडू दोरकर, भटू भोपे, नरेश मोरे, चेतन गोसावी, मयूर कुळकर्णी, मनीष तिवारी आदींच्या निवेदनात मोकाट सात कुत्र्यांनी एक वर्षाच्या खुशी नामक बालिकेचा लचके तोडत बळी घेतला.

सदाशिव नगरात मोकाट कुत्र्यांनी दोन मुलींचा चावा घेतला तेव्हा त्यांचा दक्ष नागरिकांमुळे प्राण वाचला. रात्री- बेरात्री वाहनांमागे १० ते २० मोकाट, पिसाळलेले कुत्रे मागे लागतात. वाहनधारकाचा जीव धोक्यात घालतात, असे म्हटले आहे.

मनपाचा हलगर्जीपणा

शहरात जागोजागी कुत्रे आणि प्रमुख रस्त्यांवरील सर्व मांस विक्री दुकानाजवळ मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्यांचा ठिय्या असतो. तेच नंतर नागरिकांवर हल्ला करतात. असले गंभीर प्रकार घडूनही महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. आरोग्य विभाग कोमात गेला आहे. मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे खुशी सारख्या बालिकेला जीव गमवावा लागला.

आठवड्यात उपाययोजनांबाबत मागण्या मान्य न झाल्यास कार्यकर्ते शिवसेना स्टाईलने मोकाट, पिसाळलेले कुत्रे महापालिकेच्या आवारात व अधिकाऱ्यांच्या दालनात सोडतील. शहरातील ८० टक्के मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्यांना लळिंगच्या जंगलात सोडावे. त्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करून डॉंगव्हॅन खरेदी करावे. मोकाट कुत्रे पकडण्यासाठी आंध्र प्रदेशचे पथक त्वरित बोलवावे, अशी मागणी करत शिवसेनेकडून (शिंदे) महापालिकेच्या प्रवेशव्दारावर स्व. खुशीला श्रद्धांजली वाहिली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT