Dhule News : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत नकाणे तलाव येथे सुरू असलेल्या कामास जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गुरुवारी (ता. २८) भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी मशिनरी वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या. जिल्हा जलसंधारण अधिकारी खोंडे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक महाले, नाम फाउंडेशनचे प्रदीप पानपाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Dhule Inspection of Nakane lake silt free work by district collector)
धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी ७ मार्च २०२४ च्या आदेशानुसार गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत नकाणे तलावातून गाळ काढण्यास परवानगी तसेच किसान ट्रस्ट यांना स्वखर्चाने गाळ काढून वाहून नेण्यास परवानगी दिली आहे.
नकाणे तलाव येथून दररोज ७५ टॅक्टर, २५ डंपर व दोन पोकलॅनच्या सहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. (latest marathi news)
दरम्यान, नाम फाउंडेशनला मशिनरी वाढविण्याबाबत तसेच जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी भेटीदरम्यान दिल्या.
गाळ काढण्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून नकाणे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी काढलेला गाळ घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.