MLA Jayakumar Rawal speaking at the program of distributing irrigation well approval letters to farmers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अकराशे शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजुरीपत्र; तालुक्यात ‘जलयुक्त’चा दुसरा टप्पा लवकरच

Dhule : शिंदखेडा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका परंतु मागील काही वर्षांपासून तालुक्यातील ५० टक्के भाग बागायत झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिंदखेडा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका परंतु मागील काही वर्षांपासून तालुक्यातील ५० टक्के भाग बागायत झाला आहे. तो १०० टक्के बागायती करण्याचा प्रयत्न आहे. संपूर्ण मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात जमिनीत पाणी मुरून विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी आले त्याचा फायदा झाला असून, तालुक्यात फळलागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. (Dhule Irrigation well approval letter for eleven hundred farmers)

या योजनेचा दुसरा टप्पा तालुक्यात लवकरच सुरू करणार असल्याचे आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले. शनिवारी (ता. २) दुपारी चारला शिंदखेडा पंचायत समितीच्या आवारात रोजगार हमी योजनेतून एक हजार १०० शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजुरीचे पत्र त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

शिंदखेडा पंचायत समिती सभापती छाया गिरासे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे, उपसभापती दीपक मोरे, माजी उपसभापती रणजित गिरासे, बाजार समिती सभापती नारायण पाटील, कामराज निकम, जिल्हा परिषद सदस्य धनंजय मंगळे, पंकज कदम, डी. आर. पाटील, भूपेंद्र गिरासे.

प्रभाकर पाटील, माजी सभापती अनिता पवार, भारत ईशी, भाजपा जिल्हा सरचिटणीस डी. एस. गिरासे, डॉ. दीपक बोरसे, नरेंद्र गिरासे, तालुकाध्यक्ष दीपक बागल, बाजार समिती संचालक रोशन टाटिया, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. (latest marathi news)

योजना पूर्णत्वासाठी प्रयत्न

आमदार श्री. रावल म्हणाले, की शिंदखेडा तालुक्यात आपण आमदार झाल्यानंतर तापी नदीवरील सारंगखेडा, प्रकाशा सुलवाडे हे बॅरेजस पूर्ण केले, त्यानंतर सुलवाडे-जामफळ योजना, बुराई २४ बंधारे बारमाही प्रकल्प यामुळे मोठा भाग बागायती होणार आहे. प्रकाशा-बुराई योजनेसाठी सर्वस्वी प्रयत्न सुरू आहेत.

त्यासाठी ८५० कोटींचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेपर्यंत आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात शाश्वत सिंचनाची सोय होणार आहे. तसेच जामफळ धरण पूर्ण झाल्यावर या भागातील धरणाच्या वरील दक्षिणेकडील भागात २०० हेक्टर क्षेत्र बागायत होईल अशा योजनेचे ध्येय आहे.

अर्ज प्रक्रियेसाठी मदत

क्लिष्ट ऑनलाइन अर्ज पद्धतीमुळे पहिल्या टप्प्यात कमी शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या. मात्र, पुढच्या टप्प्यात ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पंचायत समिती प्रशासन, आमदार कार्यालय शेतकऱ्यांना सहकार्य करेल.

तालुक्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर व्हाव्यात, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. गटविकास अधिकारी वाघ यांनी प्रास्ताविक केले. विस्ताराधिकारी कपिल वाघ यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT