Police officers present after the arrest of Mangalpot thief. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मंगलपोत चोर दादाभाईला ‘एलसीबी’ पथकाकडून बेड्या; पांझरा नदीपात्रात पळाल्यानंतर पोलिस शिकंज्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : देवपूरमधील नकाणे रोड परिसरात महिलेची मंगलपोत चोरणाऱ्या संशयित दादाभाईला काही तासांत ‘एलसीबी’च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून सव्वादोन लाखांची मंगलपोत हस्तगत करण्यात आली. नकाणे रोड परिसरातील शिवप्रताप कॉलनीत हेमलता निर्मलकुमार चौधरी (वय ४८) वास्तव्यास आहेत. त्या सायंकाळी सातच्या सुमारास नकाणे रोडने पायी घरी जात होत्या. ( jewellery thief Dadabhai arrested by RCB team )

त्या वेळी गळ्यावर थाप मारून चोरट्याने मंगलपोत खेचून नेली. या प्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा घडल्यानंतर संशयित पांझरा नदीपात्राकडे पळाल्याची माहिती एलसीबीला मिळाली. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तपासासाठी तीन पथके तयार केली. नकाणे रोड, साक्री रोड परिसरात नाकाबंदी करून पांझरा नदीपात्रात संशयिताचा शोध सुरू केला. फिर्यादी महिलेने दिलेल्या वर्णनाचा योगेश ऊर्फ दादाभाई हिरामण पाटील (वय २८, रा. गोताणे, ह.मु. वंजार गल्ली, सुभाषनगर, जुने धुळे) याला पकडले.

त्याच्या झडतीत दोन लाख २३ हजार किमतीची सोन्याची मंगलपोत आढळली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, अमरजित मोरे, संजय पाटील, दिलीप खोंडे, श्‍याम निकम, धनंजय मोरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, रविकिरण राठोड, पंकज खैरमोडे, योगेश चव्हाण, संदीप सरग, प्रकाश सोनार, तुषार सूर्यवंशी, शशिकांत देवरे, महेंद्र सपकाळ, सुशील शेंडे, हितेंद्र वाघ, हर्शल चौधरी, अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT