Shiv Sena contact chief Chandrakant Raghuvanshi, district chief Manoj More and other officials while discussing with the protesting workers at Laling toll booth. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अखेर टोलनाक्यावरील कामगारांना न्याय!

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिवसेनेचे नेते मंत्री दादा भुसे व शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या पुढाकाराने लळिंग टोलनाक्यावरील कामगारांना थकीत वेतन अदा करण्यासह कामावर रुजू करण्याचे लेखी आश्‍वासन टोल कंपनीकडून मिळाले. शिवसेनेच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भाजपने पाठिंबा दिला होता. (Justice for workers at toll booth)

अवधान शिवारातील इरकॉन-सोमा टोल कंपनीचे गस्तीपथकातील कर्मचारी कुणाल संजय फरताडे, पवन पिरन गवळी, कार्तिक अशोक मराठे, वैभव जितेंद्र शिंदे, मोहन संतोष उदीकर, गणेश हिरामण थोरात, भगवान खैरनार अशा सात कामगारांना सहा महिन्यांपूर्वी नव्याने नेमणूक झालेल्या कंत्राटदारामार्फत टोल कंपनीने कामावरून कमी केले.

१३५+७ अशा कामगार कर्मचाऱ्यांच्या ठेक्यात या ना त्या तांत्रिक अडचणी दर्शवून या कामगारांना कामगारांना काम नाकारले जात होते. या प्रकरणी संबंधित टोल कामगार कर्मचाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मोरे यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली. श्री. मोरे यांनी मंत्री दादा भुसे यांची मालेगाव येथे या संदर्भात भेट घेऊन संबंधित कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली. (latest marathi news)

मंत्री श्री. भुसे यांनी तत्काळ इरकॉन सोमा टोल कंपनीचे दिल्ली येथील संचालक मंडळाचे सदस्य मसूद खान यांच्याशी संपर्क साधून कामगारांवर अन्याय होऊ देऊ नये, असे सूचित केले. मात्र, त्यानंतरही लळिंग टोल कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाली नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त टोल कामगार कर्मचाऱ्यांनी श्री. मोरे यांच्या मार्गदर्शनाने टोल कंपनीच्या प्रवेशद्वारावर लक्षवेधी साखळी उपोषण सुरू केले.

कामगारांमध्ये समाधान

आंदोलनस्थळी शिवसेनेचे नंदुरबार, धुळे संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख मोरे, महानगरप्रमुख संजय वाल्हे, सारांश भावसार, पवन शिंदे, शेखर बडगुजर, कल्पेश चव्हाण, मयूर बोरसे, सनी मोरे, राजेश वाणी, पराग सामोरे, दीपक बडगुजर आदींनी भेट दिली. दरम्यान, आंदोलन सुरू केल्यानंतर दोनच तासांत लळिंग टोल कंपनीचे सीईओ यांनी कामगारांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली. न्याय मिळाल्याने संबंधित कामगारांनी समाधान व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT