Farmer Sandeep Patil and Kapdane farmer Anil Pawar sieving corn husks while showing the loss of cotton in Nyahlod Shivar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crop Insurance: कापडणेत क्रॉप इन्शुरन्स पोर्टल बंद! तुम्हीच सांगा, पीक नुकसानीची तक्रार करायची कुठं? शेतकऱ्यांचा प्रश्न

Latest Agriculture News : तक्रार नोंदवता येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. तक्रारीबाबत कुणीही दाद देत नाहीये. आता तुम्हीच सांगा, तक्रार कुठे नोंदवायची, असा संतप्त सवाल शेतकरी संदीप पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : सततच्या पावसाने पूर्वहंगामी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीची तक्रार २४ तासांच्या आत करण्यासाठी असलेले क्रॉप इन्शुरन्स अॅप बंद पडले आहे. तक्रार नोंदवता येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. तक्रारीबाबत कुणीही दाद देत नाहीये. आता तुम्हीच सांगा, तक्रार कुठे नोंदवायची, असा संतप्त सवाल शेतकरी संदीप पाटील यांनी उपस्थित केला आहे. (Kapadne crop insurance portal closed)

सलग सातव्या दिवशीही पाऊस

धुळे तालुक्यात सलग सातव्या दिवशी पावसाने हजेरी लावली. मका, बाजरी, ज्वारी, कापूस, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी मागच्या वर्षी दुष्काळाने, तर या वर्षी अतिवृष्टीने पूर्णतः संकटात सापडला आहे. मागच्या खरीप हंगामात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी या वर्षी वेळेवर पाऊस दाखल झाल्याने समाधान व्यक्त केले होते. ऑगस्टपर्यंतही सातत्यपूर्ण पाऊस झाला. सप्टेंबरच्या पूर्वार्धात ब्रेक दिला. आता खरीप चांगला येईल, असे समाधान शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होते.

ऐन काढणीच्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस होत आहे. शेतांमध्ये पाणी साचले आहे. पिकांचे खूप मोठे नुकसान होत आहे. कापसाची बोंडे सडत आहेत. बाजरी व ज्वारीची कणसांना कोंब फुटू लागले आहेत. मक्याचे भुणकेही शेतात पडून आहेत. एवढे मोठे नुकसान होऊनही तक्रार करण्यासाठी असलेले अॅप बंद आहेत. अॅप बंदमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. संबंधित अॅप तत्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (latest marathi news)

थेट शेतात पंचनामे करा

पीकविमा काढणाऱ्या शेतकरी व इतरही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे थेट शेतात जाऊन करण्याचे आदेश कृषी व महसूल विभागाला देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

"प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीक नुकसानीची तक्रार करण्यासाठी मी संपर्क क्रमांक १४४४७ वर कॉल केला. कस्टमर एक्झिक्युटिव्ह यांनी पोर्टल बंद असल्याचे सांगितले. मी तीन दिवसांपासून क्रॉप इन्शुरन्स ॲप व संपर्क क्रमांकद्वारे तक्रार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ७२ तासांचा अवधी दिलेला संपलेला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कधी तक्रार करावी."

- संदीप पाटील, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT