server down esakal
उत्तर महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: सर्व्हर डाऊनमुळे लाभार्थ्यांसह रेशनदुकानदारांना वैताग! धुळे जिल्ह्यात 23.55 टक्के काम

Dhule News : समस्येमुळे या रांगा कमी होत नाहीत. परिणामी रेशनदुकानदारही वैतागले आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ २३.५५ टक्के ई-केवायसी पूर्ण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शिधापत्रिकेवर वितरित केल्या जाणाऱ्या धान्य वितरणाच्या लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. सर्व्हर डाऊन समस्येमुळे मात्र लाभार्थ्यांसह रेशनदुकानदार अक्षरशः वैतागले आहेत. ई-केवायसीसाठी सकाळपासूनच लाभार्थी स्वस्त धान्य दुकानांबाहेर रांगा लावून असतात.

मात्र, समस्येमुळे या रांगा कमी होत नाहीत. परिणामी रेशनदुकानदारही वैतागले आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ २३.५५ टक्के ई-केवायसी पूर्ण झाली आहे. (dhule Ladki Bahin Yojana Ration shopkeeper upset with server down)

केंद्र शासनाने एप्रिल-२०२४ मध्ये शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसी पडताळणीचे आदेश दिले. धान्य वितरणात पारदर्शकता यावी असा या प्रक्रियेचा उद्देश आहे. शिधापत्रिकेत नाव असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रात आधारक्रमांक सिडींग करून, थंब देऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. अवघ्या काही मिनिटात ही प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, सद्यःस्थितीत सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे स्वस्त धान्य दुकानांसमोर रेशनकार्डधारकांसह कुटुंब सदस्यांच्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

रेशन दुकानदारही वैतागले

रेशनकार्डवरील लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश मिळाल्यानंतर रेशनदुकानदारांनी हे काम सुरू केले आहे. मात्र, सद्यःस्थितीत तांत्रिक अडचणी अर्थात सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे तासन्‌तास काम खोळंबत आहे. परिणामी दुकानासमोरील लाभार्थ्यांच्या रांगा संपत तर नाहीतच पण त्यामुळे लाभार्थी व दुकानदार यांच्यात वाद होवू लागले आहे.

लाभार्थ्यांच्याही अडचणी

स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा लाभ घेणारी कुटुंबे अर्थातच आर्थिकदृष्या गरीब कुटुंब आहेत. त्यामुळे ई-केवायसीसाठी अनेकजणांना आपला रोजचा रोजगार बुडवून स्वस्त धान्य दुकानांसमोर रांगेत उभे लागते. त्यानंतरही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांनाही मनस्ताप होतो. रोजगारही बुडाला आणि कामही झाले नाही अशी स्थिती त्यांच्यापुढे उभी राहते. (latest marathi news)

"स्वस्त धान्य दुकानदारांना एकाचवेळी अनेक कामे करावे लागतात. प्रत्येक योजनेसाठी नवीन पावती काढण्यापासून ते लाभार्थ्यांचे थंब घेणे, त्यांना धान्य वितरित करणे, प्रशासनाकडून प्राप्त विविध सूचनांनुसार कार्यवाही पूर्ण करणे अशी अनेक कामे असतात. आता ई-केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे काम पुढे सरकत नाही. शासन-प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरून यातून मार्ग काढण्याची गरज आहे."

- संतोष जैन, सचिव, स्वस्त धान्य दुकानदार चालक-मालक संघर्ष व समन्वय संघटना.

"शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे यात समस्या येत आहेत. तांत्रिक अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांनी रेशनदुकानात संयम ठेवावा, वाद घालू नये व दुकानदारांना सहकार्य करावे." - महेश शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी, धुळे.

जिल्ह्यातील ई-केवायसी स्थिती

तालुका...उद्दिष्ट...केवायसी पूर्ण...टक्केवारी

धुळे...५५४२५९...१८१८५१...३२.८१

साक्री...३८०७४९...७०५६६...१८.५३

शिरपूर...३१३४२७...४३६८२...१३.९४

शिंदखेडा...२४६७९५...५६००८...२२.६९

एकूण...१४९५२३०...३५२१०७...२३.५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT