Dhule Crime News : शेतकऱ्याच्या कापूस विक्रीची पावणेसात लाखांची रोकड बनाव करून जबरी चोरी करणाऱ्या जावयासह सासऱ्याला बुधवारी (ता. २१) दुपारी चारच्या सुमारास धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सहा लाख ८३ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला.
विजेंद्र हिंमत भोई (रा. कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) यांच्या मालकीचा कापूस चालक रवींद्र लक्ष्मण सोनवणे (रा. आडगाव, कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हा आयशर (एमएच-१९, झेड-५२०३)मध्ये भरून विक्रीसाठी गेला. (Dhule LCB)
कापूस विक्रीचे सुमारे सहा लाख ८२ हजार ९१५ रुपये सोबत घेऊन आयशरने होळ गावानजीक येताना दोघांनी दुचाकीवर येऊन वाहनाची काच फोडून रोकड हिसकावून नेल्याचा बनाव केला.
यासंबंधीची माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना केले.
पथकाने घटनास्थळी परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदार यांची विचारपूस केली. आयशरचालक रवींद्र सोनवणे याच्याकडे घटनेविषयी माहिती घेतली असता त्याच्या बोलण्यात तफावत जाणवली. त्यावरून संशय बळावल्याने अधिक चौकशी केली असता आयशरचालक सोनवणे याने हकिकत बनावट असल्याचे सांगून त्यांना कुणीही लुटले नाही.
रवींद्र सोनवणे व त्याचा सासरा मोहन निंबा महाजन (रा. एरंडोल, जि. जळगाव) याच्याशी संगनमत करून सहा लाख ८२ हजार ९१५ रुपये रोकड सासऱ्याकडे दिल्याची कबुली दिली.
पथकाने एरंडोल येथे मोहन महाजन याच्याकडे विचारपूस केली असता त्याने रोकड व मोबाईल असा सहा लाख ८३ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिंदे.
कैलास दामोदर, संजय पाटील, संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रशांत चौधरी, हेमंत बोरसे, चेतन बोरसे, संदीप सरग, संदीप पाटील, तुषार सूर्यवंशी, प्रल्हाद वाघ, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी, कैलास महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.