Leopard footprints found by forest staff in Laikhadi Shivara on Friday.
Leopard footprints found by forest staff in Laikhadi Shivara on Friday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Leopard News : थांबता थांबेना बिबट्याच्या हल्ल्यांची शृंखला!

सकाळ वृत्तसेवा

Dhule Leopard News : वन्यपशूंची पाळीव प्राण्यांवरची हल्ल्याची शृंखला थांबत नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यापासून वन्यपशू बिबट शेतकऱ्यांचे पशुधन फस्त करत आहे. गुरुवारी (ता.२०) रात्री उशिरा येथील जुन्या वसमार रस्त्यालगतच्या लायखडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात पारडीचा (म्हैस) जीव गेला. शुक्रवारी (ता.२१) सकाळी शेतकरी शेतात गेल्यावर ही घटना लक्षात आली. लायखडी शिवारात महेंद्र शांताराम ह्याळीस यांनी शेतातच पाळीव प्राण्यांची व्यवस्था केली आहे. ( leopard attack is continue in village from one week )

दुभत्या जनावरांसह पारडीही बांधली होती. रात्री उशिरा बिबट्याने पारडीचा फडशा पाडल्याचे दिसले. वनविभागास माहिती दिल्यावर वनरक्षक पी. जे. जेलेवाड, वनकर्मचारी एकनाथ गायकवाड, लक्ष्मण माळीच, पंडित खैरनार, किशोर माळीच आदींनी पंचनामा केला. धमनार, वसमार, ककाणी, राजबाई शेवाळी, चिंचखेडे, भडगाव, काळगाव आदी ठिकाणी बिबट्या आता दररोज कुठे ना कुठे तरी पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे.

वसमार शिवारात तर अनेक पाळीव प्राण्यांची बिबट्याने शिकार केली आहे. पशुधन फस्त करण्याची शृंखला काही केल्या थांबत नसल्याने पशुपालक शेतकरी हतबल झाला आहे. बेफिकीर वनविभाग पिंजरा लावून बिबट्यास कधी जेरबंद करेल, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

पावसाने दडी मारल्याने चिंतेत भर

सध्या मृग नक्षत्र संपत आले असून जोरदार पाऊस नाही. चारा, पाणी समस्येने त्रस्त झालेले शेतकरी, पशुपालक बिबट्याच्या दहशतीने मेटाकुटीला आले आहेत. पावसाअभावी पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकरी सायंकाळी उशिरा शेतात थांबत नसल्याचे चित्र आहे. ऐरवी लहान-मोठ्या प्राण्यांवर हल्ला करणारे बिबटे आता मोठ्या प्राण्यांवर हल्ला करत आहेत. (latest marathi news)

सहज शिकार करणे सुलभ होईल म्हणून बिबट लहान प्राण्यांवर हल्ला करत आल्याचे वनविभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. म्हसदीसह काकोर, वसमार, बोरमळा, सापट्या शिवारात बिबट्याची जोडी दररोज कुठे ना कुठे तरी पाळीव प्राण्यांवर हल्ला करत दर्शन देत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

बि‌‌बट्याची दहशत कायमच

वनक्षेत्रात असणारे बिबटे आता सावज (भक्ष्य) शोधण्यासाठी शेत शिवारात बिनधास्त फिरत असल्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या माणसाचीही शिकार करू शकतो हे वनविभागाने गांभीर्याने घ्यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वी बेहेडला दिवसा हल्ला झाल्याने सावध शेतकरी बचावला. भविष्यात बिबटे नरभक्षक होतील, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

यंदा विहिरींनी तळ गाठल्याने ऐन पावसाळ्यातही शेती ओस पडली आहे. केवळ पाळीव प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध होईल इतका वेळ वीज पंप चालवून जनावरांची तहान भागविली जात आहे. दरवेळी पाळीव प्राणी ठार झाल्यावर वनविभागाकडून पंचनामा होतो. परंतु नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची भटकंती मात्र ठरलेलीच असते. अलीकडे सर्वच शेती उपयोगी जनावरे शेतात बांधलेली असतात. प्रत्येक शेतकऱ्यास शेतात राहणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर बिबट्यास जेरबंद करत भयमुक्त करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari 2024: पावसाच्या सरींच्या साथीने अवघा वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल! दर्शनासाठी लोटला भाविकांचा जनसागर

Devendra Fadnavis: महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय? अजित पवारांच्या मंत्र्याला फडणवीसांचे भाजप प्रवेशाचे निमंत्रण

T20 World Cup 2024: रोहितच्या रोबो वॉकचा असा शिजला होता प्लॅन, ICC च्या Video ने उघडलं रहस्य

Vidhan Sabha Election: महायुतीत कोणाला किती जागा? भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

INDIA: अयोध्या जिंकणारा खासदार ठरणार जायन्ट किलर? लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी 'इंडिया'चा मोठा डाव

SCROLL FOR NEXT