Municipal Corporation employees covering political placards in various parts of the city as the Lok Sabha Election Code of Conduct came into effect. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Code of Conduct : राजकीय ‘ताईत’ गुंडाळले! नेत्यांचे फोटो, बॅनर, झेंडे उतरविले; फलक, कोनशिला झाकल्या

Dhule News : ही कार्यवाही यापुढेही सुरू राहणार असल्याने किमान आचारसंहिता लागू असेपर्यंत हा मोकळा श्‍वास कायम राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने धुळे महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे शहरातील राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर, पोस्टर्स काढण्यासह विविध कामांच्या कोनशिला कमानीवरील मजकूर झाकण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

त्यामुळे दोनच दिवसांत बॅनर, पोस्टर्समुळे गुदमरलेल्या धुळे शहराने मोकळा श्‍वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही कार्यवाही यापुढेही सुरू राहणार असल्याने किमान आचारसंहिता लागू असेपर्यंत हा मोकळा श्‍वास कायम राहणार आहे. (Dhule Lok Sabha Code of Conduct marathi news)

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिताही लागू झाली. याबरोबर शासकीय यंत्रणा कामाला लागली. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर, झेंडे, विविध कामांच्या कोनशिला आदी काढणे अथवा झाकण्याची कार्यवाही सुरू झाली. १६ मार्चला महापालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील १६५ झेंडे, ७२ बॅनर्स/पोस्टर्स, नऊ कोनशिला/कमानींबाबत कार्यवाही केली. रविवारी (ता. १७) दुसऱ्या दिवशीदेखील ही कार्यवाही सुरू राहिली.

पथकाने सायंकाळी पाचपर्यंत ९० झेंडे, १४ बॅनर काढले, २३ कोनशिला कागदाने झाकून टाकल्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहराच्या विविध भागांतील अडीचशेवर झेंडे काढण्यात आले. ३२ कोनशिला/कमानीवरील मजकूर झाकण्यात आला, तर ८६ बॅनर/पोस्टर्स काढण्यात आले. ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. (latest marathi news)

दरम्यान, शासकीय कार्यालयांमधील राजकीय व्यक्तींचे फोटो काढणे व आनुषंगिक साहित्याबाबतही पथकांकडून कार्यवाही करण्यात आली. शासकीय कार्यालयांमध्ये लागलेले नेत्यांचे फोटो व जाहिरातीही काढण्याची कार्यवाही पथकाकडून करण्यात आली. ही प्रक्रिया आचारसंहिता लागू असेपर्यंत सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT