MLA :- Jayakumar Rawal Former MLA:- Ramakrishna Patil Congress District President:- Shyam Saner NCP (Sharad Pawar group):- Sandeep Bedse Shivsena (Ubatha) District Chief:- Hemant Salunkhe esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : भाजप, कॉंग्रेसच्या मतविभागणीवर आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते ठरणार

सकाळ वृत्तसेवा

विजयसिंह गिरासे : सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Constituency : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणूकीत भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना मताधिक्य दिले आहे. या निवडणुकीत सोमवारी (ता.२०) झालेल्या एक लाख ८२ हजार ९५३ (५५.१३ टक्के) मतदानापैकी आमदार रावल भाजपला किती मताधिक्य देतात व कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव किती मते घेता यावर आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते ठरणार आहेत, त्यामुळे या निकालाकडे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. ( calculations of upcoming assembly elections will be based on vote distribution of BJP and Congress)

धुळे लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये कॉंग्रेसतर्फे अमरीशभाई पटेल व भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. सुभाष भामरे निवडणूकीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून डॉ. भामरे यांना आघाडी देण्यात आली. २०१९ लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातर्फे कुणाल पाटील तर भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. सुभाष भामरे यांना शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य देण्यात आले होते.

जिल्ह्याच्या राजकारणात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची महत्वाची भूमिका असते, हे यापूर्वी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व विविध निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. आमदार जयकुमार रावल यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षातील जिल्ह्यातील सर्व नेते एकही संधी सोडत नाहीत. आमदार रावल यांचे जनतेशी जुळलेल्या नात्यामुळे त्यांच्या वर्चस्वाला 'तडा' जात नाही.

शिंदखेडयात फक्त भाजपाचा कस लागणार

यंदाच्या निवडणूकीत डॉ.भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असली तरी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून फक्त आमदार जयकुमार रावल व भाजपच्या पदधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून डॉ. भामरे यांना जास्तीत जास्त मतांची आघाडी कशी देता येईल यासाठी प्रयत्न केले. महायुतीतील शिवसेनेचे अस्तित्व शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात नसल्यासारखेच आहे. (latest political news)

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्ते आहेत पण त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत बघ्याची भूमिका घेतली. महाविकास आघाडीच्या कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना आघाडीतील सर्व घटक पक्षाने झाडून मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या पदरात किती मते पडतात याकडे लक्ष लागले आहे.

‘महाविकास’च्या नेत्यांची नजर शिंदखेड्यावर

आमदार जयकुमार रावल यांची शिंदखेडा विधानसभा मतदारसंघावर एक हाती सत्ता आहे. त्यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील माजी आमदार रामकृष्ण पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संदीप बेडसे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्यासह आघाडीतील प्रमुख पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपचे उमेदवार डॉ. भामरे यांचे मताधिक्य कमी करण्यासाठी तळ ठोकून होते.

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते २०१४

डॉ. सुभाष भामरे अमरिशभाई पटेल आघाडी भाजप कॉंग्रेस मते

९५८५२ ६२५४६ ३३३०६

२०१९

डॉ. सुभाष भामरे कुणाल पाटील आघाडी भाजप कॉंग्रेस मते

११३६६७ ६००७८ ५३५८४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT