Dr. shobha bachhav Dr. Subhash Bhamre esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : भाजपनेच भाजपला पाडले! शेतकऱ्यांसह मुस्लिम, इतर घटकांची नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर

Lok Sabha Constituency : भाजपचे खासदार म्हणून उमेदवार डॉ. सुभाष भामरे निवडून येतील, असा अतिआत्मविश्‍वास या पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये दिसत होता.

निखिल सूर्यवंशी

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत ‘हॅट्‍‍ट्रिक’ साधत भाजपचे खासदार म्हणून उमेदवार डॉ. सुभाष भामरे निवडून येतील, असा अतिआत्मविश्‍वास या पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये दिसत होता. मोदी फॅक्टर, उमेदवाराने दहा वर्षांत केलेली विकासकामे आणि हिंदुत्व हा या पक्षाच्या प्रचारातील मुद्दा होता. याअनुषंगाने अमलात आणलेली रणनीती भाजपवरच ‘बूमरँग’ झाली. शिवाय पक्षांतर्गत दुफळीमुळे भाजपने भाजपला पाडले आणि विजय काँग्रेसच्या पथ्यावर पडल्याचा निष्कर्ष निकालानंतर काढला जात आहे. ( issues of BJP candidates was brought up )

धुळे लोकसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवारीचा मुद्दा ऐरणीवर आणण्यात आला. उमेदवारीसाठी इच्छुक डॉ. भामरे यांच्या वयाचा मुद्दा पुढे करत, त्यांच्याविषयीची नाराजी, ‘ॲन्टी इन्कबन्सी’मुळे पडद्याआडून भाजपचे नवखे तरुण चेहरे उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, अनुभवाच्या बळावर उमेदवारी मिळविण्यात डॉ. भामरे यांनी यश मिळविले.

गटबाजीकडे दुर्लक्ष

असे असले तरी प्रत्यक्षात धुळे शहरासह जिल्ह्यातील भाजप पक्षांतर्गत गटबाजी लपून राहिलेली नव्हती. ती थोपविण्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुर्लक्ष केल्याचे कार्यकर्तेही उघडपणे बोलत होते.

परिणामी, त्यांच्यासह उमेदवार डॉ. भामरे यांना धुळे मतदारसंघातील कांदाप्रश्‍नी संतप्त शेतकरी, मणिपूरप्रश्‍नी चिडलेला आदिवासी समाज, दलित समाजाची नाराजी नेमकी टिपता आली नाही किंवा नाराजी टिपली तरी स्थिती सावरण्यासाठी ठोस उपाय योजले नाहीत. याशिवाय पक्षांतर्गत गटबाजी, रुसवेफुगवे, विशिष्ट समुदायाविरुद्ध आक्रमक भाषणे पाहता भाजपनेच भाजपचा पाडाव केला, असा निष्कर्ष जाणकार काढू लागले आहेत. (latest marathi news)

जातीय समीकरणाची भिस्त

भाजपच्या विजयाची भिस्त ही मुस्लिमबहुल मालेगाव मध्य आणि धुळे शहर मतदारसंघातील मतविभाजनावर अवलंबून असते. मुस्लिम उमेदवार अधिक, तितके मतविभाजन होऊन भाजपचा विजय सुकर, असे समीकरण अमलात आणले जाते. यंदा वंचित बहुजन आघाडीतर्फे मुस्लिम उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद आणि एमआयएम पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने जातीय समीकरणे बदलली. परिणामी, मतविभाजनातील लाखाच्या मतदानाचा तुटवडा कसा आणि कुठल्या मतदारसंघातून भरून काढावा हा भाजपपुढे मोठा प्रश्‍न उभा राहिला.

प्रमुख नेत्यांची बगल

याउलट उमेदवार डॉ. भामरे यांच्या धुळ्यातील प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदारसंघातील ज्वलंत कांदा निर्यातीचा प्रश्‍न, बेरोजगारी, महागाईसंबंधी प्रश्‍नाला दिलेली बगल पाहाता शेतकऱ्यांसह हिंदू मतदारांमध्ये कायम राहिलेली नाराजी आणि मालेगाव येथे उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेऊन मुस्लिम मतदारांची एकी होण्यास पोषक स्थिती निर्माण केल्याने त्याचा फटका भाजपला निकालातून बसल्याचे कुणीही अमान्य करणार नाही.

शिवाय हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडताना मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांमुळे दुखावल्या गेलेल्या समुदायाने अधिकाधिक मतदान काँग्रेसच्या पारड्यात टाकण्याचे निश्‍चित केले. तुलनेत हिंदू समाजाचे मतदार घराबाहेर काढण्यात भाजपने पुरेसे कष्ट घेतले नाहीत हा कार्यकर्त्यांच्या चर्चेतील मुद्दाही अधोरेखित करण्यासारखा आहे. त्याचा परिपाक भाजपला या निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे.

मोदी लाट ओसरली

काँग्रेसने उमेदवार डॉ. भामरे आणि भाजपविरोधातील धुळे लोकसभा मतदारसंघातील ‘ॲन्टी इन्कबन्सी’ ओळखून वाढती महागाई, बेरोजगारी, औद्योगिक विकासाचा अभाव, पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्‍न मांडण्यावर भर दिला. कांदा निर्यातप्रश्‍नी गुजरातने महाराष्ट्राबाबत कसा दुजाभाव केला आणि त्यावर भाजपचे मंत्री, नेते का बोलत नाहीत, तसेच अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेद्वारे धुळे ग्रामीणच्या पश्‍चिम पट्ट्यातील पाणी पळविल्याचा भाजपवर आरोप करीत काँग्रेसने उमेदवार डॉ. भामरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

यासह जातीय समीकरणाच्या बळावर काँग्रेसने विजयी वाटचाल करताना मोदी लाट ओसरणे, भाजपमधील दुही, नेत्यांच्या भाषणात परिणामकारकता नसल्याने, मतदारराजाची नाराजी ओळखण्यात कमी पडल्याने भाजपने भाजपला पाडल्याचा निष्कर्ष जाणकार काढू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT