Dhule Lok Sabha Constituency esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : धुळ्यापुढे जळगावची रॅली फिकी!

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : निवडणूक कुठलीही असो तीत प्रचारावेळी स्वकीय किंवा विरोधकांसाठी वेगवेगळ्या पद्‌धतीची टोलेबाजी, चिमटे, धमाल केली जात असते. त्याचा प्रत्यय जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निरनिराळ्या विधानातून सोमवारी (ता. २९) आला. सभेत प्रचार रॅलीविषयी बोलताना त्यांनी धुळ्यापुढे जळगावची रॅली फिकी वाटू लागली. (Dhule Lok Sabha Constituency)

महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना `पाणीवाले बाबा`, अशी उपाधी देणे आणि विरोधक माजी आमदार अनिल गोटे यांना मनपा निवडणुकीच्या मुद्यावरून चिमटी काढण्याची संधी सोडली नाही. शक्तीप्रदर्शन करीत महायुतीच्या उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला. त्यासाठी पालकमंत्री महाजन उपस्थित होते.

खुमासदार शैलीतून भाषण करताना सर्वप्रथम त्यांनी डॉ. भामरे यांना `पाणीवाले बाबा`, अशी उपाधी देऊन खसखस पिकविली. दोन महत्त्वाकांक्षी जलप्रकल्प मार्गी लावण्यात डॉ. भामरे यांचे योगदान असल्याने ही उपाधी देत असल्याचे मंत्री महाजन यांनी निदर्शनास आणले. यानंतर त्यांनी धुळ्यातील पक्षाच्या उमेदवाराचे शक्तीप्रदर्शन आणि महारॅलीची जळगाव येथील पक्षाच्या रॅलीशी तुलना केली.

धुळ्याने उच्चांक गाठला

जळगावला रावेर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे, जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी एकत्रितपणे शक्तीप्रदर्शन करतीन महारॅलीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याचा दाखला देत मंत्री महाजन म्हणाले, की जळगावला निघालेली ही महारॅली राज्यात सर्वांत मोठी असल्याचा दावा झाला. (Latest Marathi News)

भाजपच्या या दोन उमेदवारांची मिळून ही रॅली होती. परंतु, धुळ्यात पक्षाच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी निघालेल्या महारॅलीने गर्दीचा उच्चांक, विक्रम तर मोडला, शिवाय त्यापुढे जळगावची रॅली फिकी वाटत असल्याचे विधान मंत्री महाजन यांनी करताच येथील उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची छाती फुगून आली.

गोटे यांना चिमटा

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी आमदार गोटे यांनी मंत्री महाजन, आमदार जयकुमार रावल, डॉ. सुभाष भामरे यांना आरोपांच्या रडारवर ठेवलेले आहे. धुळे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपला ५० जागा मिळतील, असे मंत्री महाजन यांनी सांगितले होते.

ते खरे ठरले आणि भाजपला ५० जागा मिळाल्या होत्या. पण या बोलण्याचा माजी आमदार गोटे यांना राग आला होता, असा चिमटा मंत्री महाजन यांनी प्रचार महारॅलीनंतरच्या जाहीर सभेतून घेतल्याने उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

मताधिक्क्य `४ लाख ३२ हजार` ठरवले

धुळे मतदारसंघात डॉ. भामरे यांना ३ लाख ३२ हजारांचे मताधिक्क्य मिळवून द्यायचे आहे, असे सांगताना मंत्री महाजन यांनी उपस्थितांकडून तशी हमी घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांमधून मात्र ४ लाख ३२ हजाराचे मताधिक्य मिळवायचे आहे, असा हेका लावला. त्यावर मंत्री महाजन म्हणाले, की डॉ. भामरे यांना ४ लाख ३२ हजाराचे मताधिक्य मिळवून दिले.

तर जळगाव- रावेर दुसऱ्या क्रमांकावर जाईल. ते परवडणार नाही. त्यामुळे जळगाव- रावेर मतदारसंघासाठी ४ लाख ३२ हजाराचे मताधिक्य मिळविण्याचे, तर धुळे मतदारसंघासाठी ३ लाख ३२ हजाराचे मताधिक्य मिळविण्याचे कार्यकर्त्यांच्या बळावर ठरविले आहे, त्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी, असे मंत्री महाजन सभेत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT