Dhule Lok Sabha Constituency  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्दे केंद्रस्थानी! 10 वर्षात सर्वांगिण विकासाअभावी मतदारात रोष

धनंजय सोनवणे

साक्री : लोकसभा निवडणूक प्रचार रंगतदार अवस्थेत आलेला असताना आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडू लागलेल्या आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील साक्री विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रीय मुद्द्यांसोबतच स्थानिक मुद्दे देखील प्रकर्षाने निवडणुकीच्या केंद्रस्थानी दिसून येत आहेत. (Dhule Local issues at center of election campaign)

विशेषतः परिवर्तन होवून देखील गेल्या दहा वर्षात तालुक्याच्या सर्वांगीण विकासात फारशी प्रगती दिसून येत नसल्याने मतदारांचा रोष या निमित्ताने व्यक्त होताना दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात येत्या १३ मे रोजी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया होत आहे. यात साक्री विधानसभा मतदारसंघात देखील मतदान होणार असल्याने प्रचाराला अवघा पंधरा दिवसांचा कालावधी उरला आहे.

या कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप, काँग्रेससह अन्य इच्छुक उमेदवारांचा सुरू आहे. यातून प्रचारात रंगत आली असून, आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. या आरोप- प्रत्यारोपांमध्ये राष्ट्रीय प्रश्नांसोबतच स्थानिक प्रश्नांचा देखील ऊहापोह होताना दिसत आहे. खासदारांची भूमिका यावरही चर्चा होत असली तरी स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खासदारांची भूमिका यावर देखील मोठी चर्चा होताना दिसत आहे.

प्रलंबित प्रश्न जैसे थे...

निवडणूक प्रचाराच्या या धामधुमीत साक्री तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात चर्चा यंदा होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून साक्री तालुक्यात बंद असलेल्या पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या प्रगतीवर यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहेत. (Latest Marathi News)

नवीन कुठलाही औद्योगिक प्रकल्प सुरू झालेला नसताना आधीचेही प्रकल्प सुरू करण्यात प्रगती झालेली नसल्याने बेरोजगारीचा मुद्दा या निमित्ताने ऐरणीवर येत आहे. याशिवाय सिंचनाचे कुठलेही नवीन प्रकल्प तालुक्यात होऊ शकलेले नाहीत. याउलट तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामाला देखील चालना मिळू शकलेली नाही.

त्यांच्या वितरिकांच्या कामांमध्ये देखील कुठलीही प्रगती झाल्याचे दिसत नाही. याचा परिणाम तालुक्याच्या सिंचनावर झालेला दिसून येतो. तालुक्यात उच्च शिक्षणाच्या सुविधांचा अभाव दिसून येतो. अजूनही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरांची वाट धरावी लागतेय. कधीकाळी साक्री तालुक्यासाठी रेल्वेचे आश्वासन निवडणूक प्रचारात देण्यात आले होते.

मात्र रेल्वे तर दूरच,राष्ट्रीय महामार्गांची कामेदेखील गेल्या दशकात पूर्ण झालेली नाहीत. तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षापासून सुरू असून, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. या कामातील अनेक गंभीर चुकांमुळे आतापर्यंत शेकडो निष्पाप नागरिकांना जीव गमावावा लागला आहे.

विशेषत: शेवाळी फाटा येथील सर्कल अतिशय धोकादायक असून दोनच दिवसांपूर्वी त्या ठिकाणी दहिवेल येथील एका अठरा वर्षाच्या तरुणाला जीव गमावा लागला आहे. यासारखे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

कांदा कुणाला रडवणार...

एकीकडे विकासकामांमधील प्रगती दिसून येत नसताना ज्या कृषी क्षेत्रामुळे तालुक्याचे अर्थकारण सुरू आहे ते कृषी क्षेत्रदेखील अडचणीत आल्याचे दिसून येते. अस्मानी सोबतच सुलतानी संकटांना तोंड देताना बळीराजाच्या नाकीनऊ आल्याचे दिसून येते. यंदा तर थोडा पाऊस कमी झाला तरी दुष्काळाची दाहकता अनुभवायला येत आहे.

या दुष्काळातही पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा, कापूस यासह अन्य शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे. शिवाय शेतीच्या वाढलेल्या खर्चामुळे हा रोष आणखीनच वाढतो आहे. विशेषत: कांद्याच्या दराने शेतकरी वर्गात मोठी नाराजी असून ही नाराजी कुणाला रडवणार हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT