Dhule Lok Sabha Constituency esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency: विरोधकांमध्ये ऐक्य घडविण्याची चाल! BJPशी निर्णायक मुकाबल्याचे आजी- माजी लोकप्रतिनिधींचे मनसुबे

Lok Sabha Election 2024 : भाजपशी निर्णायक मुकाबल्यासाठी इतर विरोधकांमध्ये ऐक्य घडविण्याची चाल मतदारसंघातील काही आजी- माजी लोकप्रनिधींनी रचण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदारांची सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यावर या पक्षांतर्गत गटबाजी उफाळली. हाच कित्ता काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यावर नाराज कार्यकर्त्यांनी गिरविला आहे.

त्यामुळे दोन्ही पक्षात नाराज गटाची एक फळी निर्माण झाल्याचे दिसते. अशा वातावरणात भाजपशी निर्णायक मुकाबल्यासाठी इतर विरोधकांमध्ये ऐक्य घडविण्याची चाल मतदारसंघातील काही आजी- माजी लोकप्रनिधींनी रचण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. (Dhule Lok Sabha Constituency election 2024 marathi news)

जातीय समीकरणे आणि विकासाच्या काही मुद्यांवर लोकसभेच्या धुळे मतदारसंघाची निवडणूक रंगत असते. त्याचा प्रत्यय यंदाच्या निवडणुकीत येणारच आहे. त्यापेक्षाही पडद्याआडून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दैनंदिन होणाऱ्या शह- काटशाह, कुरघोडीच्या राजकीय चालींमुळे निवडणूकीत अधिकाधिक रंगत भरली जाणार आहे.

भाजपमुळे अस्वस्थता

धुळे लोकसभा मतदारसंघाची फेरपुनर्रचना झाल्यावर २००९ पासून भाजपने हा सत्तेचा गड ताब्यात ठेवला आहे. तेव्हापासून काँग्रेसची हा गड सर करताना दमछाक होत आहे. भाजपने यंदा तिसऱ्यांदा खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे. ते वयात बसत नाहीत, त्यांच्याविषयी वरिष्ठ पातळीवर नाराजी आहे,

`ॲन्टी इन्कबन्सी`चा भाजपला फटका बसेल, त्यांनी दहा वर्षांत काय कामे केली, असे विविध मुद्दे त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पक्षांतर्गत गटबाजीतून चर्चेत आणले गेले. परंतु, भाजपने या चर्चेतील मुद्यांकडे दुर्लक्ष करीत डॉ. भामरे यांना उमेदवारी जाहीर करीत त्यांच्या कार्यावर विश्‍वास दर्शविला. त्यामुळेच त्यांच्या पक्षांतर्गत आणि इतर पक्षीय विरोधकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली.  (latest marathi news)

काँग्रेसमध्ये गोंधळ

भाजपच्या उमेदवारासंदर्भात या पक्षांतर्गत वातावरणाचा लाभ उठवावा आणि त्यास जातीय समीकरणाची जोड देऊन यश पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करावा, असे मनसुबे काँग्रेसमधील इच्छुकांनी आखण्यास सुरूवात केली. परंतु, काँग्रेसने नाशिकवासी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी घोषित करताच त्यास प्रमुख इच्छुक डॉ. तुषार शेवाळे, श्‍यामकांत सनेर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून विरोध सुरू झाला.

डॉ. बच्छाव यांचे स्वतःचे मत मतदारसंघात नाही, त्यांना मतदारसंघात फारसे ओळखले जात नाही, त्यामुळे उमेदवार बदलून दिला जावा, अशी मागणी नाराज कार्यकर्त्यांनी केल्यावर या पक्षात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवारीसंदर्भात निर्माण करण्यात आलेला घोळ अद्याप नेत्यांकडून निस्तारला गेलेला नाही.

चालबाजांसाठी संधी

भाजप, काँग्रेसमधील या वातावरणाचा लाभ मतदारसंघातील काही राजकीय `चाल`बाज आजी- माजी लोकप्रतिनिधींनी उठविण्यासाठी कंबर कसली आहे. यात भाजपमधील काही नाराज लोकप्रतिनिधी पडद्याआडून चाली रचत असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही, तर इतर पक्षाचे काही लोकप्रतिनिधी भाजपविरोधात निर्णायक मुकाबल्यासाठी इतर सर्व विरोधकांमध्ये ऐक्य घडविण्यासाठी चाल रचत आहेत.

यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत संस्थापक अध्यक्ष असलेल्या लोकसंग्राम पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी काँग्रेससह भाजपमधील नाराज, तसेच भाजपच्या इतर सर्व विरोधकांना एकत्र करण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी भेटीगाठींचे सत्र सुरू केले आहे.

भाजपचा पाडाव करण्यासाठी नाराजीतून कुणी आपापल्या पक्षाचे राजीनामे न देता लढावे, तसेच त्यासाठी काँग्रेसने सर्वमान्य उमेदवार द्यावा, अशा आवाहनाचे पत्रक त्यांनी काढले आहे. अशा रंगतदार घडामोडींसह मतदारसंघातील जातीय समीकरणांच्या हालचालींवर मतदारांचेही बारीक लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

दाऊदने मला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून...; Lalit Modi यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, शाहरुख खान...

TRAI New Rules : मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून OTP बंद होणार? ग्राहकांचा फायदा की नुकसान, नेमकं प्रकरण वाचा

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : नाना पटोले यांनी दिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT