Bjp , Congress esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : काँग्रेसच्या भूमिकेच्या वाटेवरच आता भाजपचे पाऊल!

Dhule News : मतदार राजाने लोकसभेचा धुळे मतदारसंघ तब्बल ४७ वर्षे काँग्रेसच्या, तर २५ वर्षे भाजपच्या हातात सोपविला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मतदार राजाने लोकसभेचा धुळे मतदारसंघ तब्बल ४७ वर्षे काँग्रेसच्या, तर २५ वर्षे भाजपच्या हातात सोपविला. अशा एकूण ७२ वर्षांच्या कालावधीत मतदारसंघाचा अपेक्षित सर्वांगिण विकास झाल्याचे चित्र दिसत नाही. या अनुषंगाने काँग्रेसची भूमिका, तीच गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची दिसून येत आहे. यात काँग्रेसला यंदा उमेदवाराचा शोध घेण्याची नामुष्की येत असल्याने निवडणुकीत भाजपला सत्तेसाठी `आयते कोलित` दिल्यासारखी गत असल्याचे मत राजकीय जाणकार मांडतात. (Dhule Lok Sabha Constituency)

लोकसभेच्या धुळे मतदारसंघाची जागा परंपरेप्रमाणे महायुतीत भाजपला, तर महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटली आहे. या मतदारसंघात धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील एकमेव काँग्रेसचे आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या उमेदवारीवर पक्षाच्या विजयाची मदार होती. मात्र, त्यांनी नेत्यांना लोकसभा निवडणुकीसाठी मी आणि पत्नी अश्‍विनी पाटील या इच्छुक नसल्याचे कळविले.

भाजपला आयते कोलित

काँग्रेसतर्फे उमेदवाराचा शोध सुरू झाला. यात पक्षाचे डॉ. तुषार शेवाळे, श्‍यामकांत सनेर, डॉ. शोभा बच्छाव, भाजपचे नाराज डॉ. विलास बच्छाव, प्रताप दिघावकर यांच्यासह हा शोध तूर्त शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्यापर्यंत जाऊन थांबला आहे. त्यांनी पक्ष प्रवेश करावा आणि काँग्रेसतर्फे उमेदवारी करावी, अशी गळ घातली जात आहे. काँग्रेसच्या या स्थितीमुळे निवडणुकीत भाजपला सत्तेसाठी `आयते कोलित` मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे मत जाणकारांच्या पातळीवर मांडले जात आहे.

विविध पातळीवरून वेध

एकिकडे ही स्थिती असताना धुळे लोकसभा मतदारसंघाचा कसा विकास होईल, असा प्रश्‍न अनेक सुज्ञ मतदारांना पडला आहे. त्यामुळे ते काँग्रेसची जी भूमिका होती...तीच आज भाजपची दिसून येत असल्याच्या निष्कर्षाप्रत पोचत आहेत. या मतदारसंघात एकूण ७२ वर्षांत सर्वाधिक ४७ वर्षे काँग्रेसने अधिराज्य गाजविले. उर्वरित एकूण २५ वर्षांमधील गेला सलग पंधरा वर्षांचा काळ भाजपच्या वाटेला आला आहे. या स्थितीत धुळे मतदारसंघाचा नेमका काय विकास साधला गेला याचा वेध आता विविध पातळीवरून घेतला जात आहे. (dhule political news)

खासगी क्षेत्राला चालना नाही

गेल्या दोन ते अडीच दशकांमधील स्थितीचे अवलोकन केले तर सहकार क्षेत्र डळमळीत झाले. या क्षेत्रावर आधारित अनेक पतसंस्था, बँका, संघ, कारखाने अवसायनात निघाले. त्याचा रोजगार आणि शहरी व ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला. या स्थितीत धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस असो की भाजप या पक्षाच्या खासदारांनी खासगी क्षेत्राला चालना मिळण्यासाठी काय ठोस प्रयत्न केलेत, असा भल्याभल्यांना पडलेला प्रश्‍न आहे.

विकास प्रकल्प प्रलंबित

शिंदखेडा मतदारसंघातील सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना, मनमाड- इंदूर रेल्वे महामार्गातील एक भाग बोरविहीर- नरडाणा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन, धुळे शहरासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना, मालेगाव शहरात भूयारी गटार योजना, बागलाणमधील हरणबारी डावा कालवा आदी प्रकल्प भाजपच्या राजवटीत मार्गी लागले.

ही एक जमेची बाजू सोडली तर मतदारसंघातील रोजगारक्षम मुंबई- दिल्ली इंडस्ट्रीअल कॉरीडॉर प्रकल्प, धुळे शहरातील केंद्र सरकारच्या नियंत्रणातील प्रताप मिल, मालेगाव बाह्य वळण रस्ता प्रकल्प आदी प्रकल्प प्रलंबितच राहिले आहेत.

त्याविषयी काँग्रेस किंवा भाजपची भूमिका काय राहिली ते समजून आलेले नाही. आजही धुळे लोकसभा मतदारसंघ औद्योगिक विकासासह रोजगार, पाणी, सिंचन, आरोग्यासंबंधी समस्यांशी झुंजतो आहे. त्यातून कशी आणि कोण सुटका करेल याची मतदारांना प्रतिक्षा असेल.

मतदारसंघात श्रेयासाठी हेवेदावे

धुळे लोकसभा मतदारसंघात काही विकासाचे प्रकल्प काँग्रेसच्या राजवटीत ऐरणीवर आले. त्यात उदाहरणदाखल सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना, मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग आदी असे प्रकल्प काँग्रेसच्या काळात मार्गी लागू शकले नाहीत. असे प्रकल्प भाजपच्या राजवटीत मार्गी लागत आहेत. मात्र, अशा प्रकल्पांच्या श्रेयवादात नेते मंडळी अडकल्याचे चित्र दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT