Dhule Lok Sabha Constituency  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : खासदार निवडीत महिलांची भूमिका निर्णायक; साडेनऊ लाखांवर स्त्री मतदार

Dhule News : राजकारणात पुरुषांबरोबर महिलांची संख्याही वाढलेली आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राजकारणात पुरुषांबरोबर महिलांची संख्याही वाढलेली आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. विशेष म्हणजे महिलांकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतून लोकसभेच्या धुळे मतदारसंघात खासदार निवडीसाठी महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मतदारसंघात एकूण २० लाख ७५२ मतदार आहेत. त्यात महिला मतदारांची संख्या नऊ लाख ५९ हजार ४१६ आहे. 9Dhule Lok Sabha Constituency)

धुळे जिल्ह्यात १८ ते २३ वयोगटातील सरासरी १७ हजार ३२१ नवीन मतदारांची नोंद झाली आहे. तसेच ८५ वर्षांवरील वयोगटातील मतदारांची संख्या २३ हजार आहे. दहा हजार ९०० मतदार दिव्यांग आहेत. आवश्यकतेनुसार त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मतदान केंद्रांवर त्यांच्या सोयीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंग व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

महिलांचा वाटा मोठा

मतदारसंघात खासदार निवडीसाठी पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदारांचाही वाटा मोठा असणार आहे. महिला मतदारांची सर्वाधिक संख्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात असून, ती एक लाख ८८ हजार १३६ आहे. (Latest Marathi News)

सर्वांत कमी महिला मतदार बागलाण विधानसभा क्षेत्रात एक लाख ३५ हजार ८२ इतकी आहे. या मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. मतदानासाठी महिलांतर्फे जनजागृती होत आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या

* मतदारसंघ ......पुरुष ......स्त्री ......तृतीयपंथी ......एकूण

* धुळे ग्रामीण : ......२,०२,४८५ ......१,८८,१३६ ......०१ ......३,९०,९६२२

* धुळे शहर : ......१,७६,९८० ......१,६१,८२३ ......२७ ......३,३८,८३०

* शिंदखेडा : ......१,६८,६८१ ......१,६१,२२८ ......०१ ......३,२९,९१०

* मालेगाव मध्य : ......१,५६,१२२ ......१,४३,६१८ ......०८ ......२,९९,७४८

* मालेगाव बाह्य : ......१,८७,७७५ ......१,६९,५२९ ......०७ ......३,५७,३११

* बागलाण : ......१,४९,२४७ ......१,३५,०८२ ......०२ ......२,८४,३३१

* एकूण : ......१०,४१,२९० ......९,५९,४१६ ......४६ ......२०,००,७५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT