Shyam Saner, Dr. Shobha Bachhav, Dr. Sudhir Tambe, Dr. Tushar shewale esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : दररोज नवे चेहरे, नव्या नावांमुळे ‘मविआ’ इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Dhule : धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करीत प्रचारालाही सुरवात केलेली असताना महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा केली जात नसल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करीत प्रचारालाही सुरवात केलेली असताना महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा केली जात नसल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीत धुळ्याची जागा काँग्रेसला सोडण्यात आली. उमेदवाराबाबत रोज नवनवीन चेहरे, नावे समोर येत आहेत. दुसरीकडे खुद्द ‘मविआ’च्या इच्छुकांमध्येही कमालीची अस्वस्थता पसरली. दरम्यान, गुढीपाडव्यानंतरच पक्षाचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. (Dhule Lok Sabha Constituency)

धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे व नाशिक जिल्ह्यातील तीन-तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा हे तीन विधानसभा मतदारसंघ धुळे जिल्ह्यात येतात. मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात येतात. भाजपकडून अर्धा डझनपेक्षा अधिक इच्छुक होते.

या वेळी डॉ. भामरे यांना उमेदवारी मिळते की नाही, याबाबत पक्षाचे नेतेच साशंकता व्यक्त करीत होते. भाजप नेतृत्वाने मात्र डॉ. भामरे यांच्यावर विश्‍वास व्यक्त करीत त्यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली. डॉ. भामरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर नाराजीनाट्य अजूनही सुरूच आहे. विशेषत: सोशल मीडियावर त्यांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे.

उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांना अजूनही डॉ. भामरे यांची उमेदवारी बदलण्याची आशा आहे. प्रत्यक्षात डॉ. भामरे यांनी मेळावे व भेटीगाठीतून प्रचार सुरू केला. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर यांच्या नावांची प्रारंभीपासूनच चर्चा आहे. दुसरीकडे मतदारसंघातीलच उमेदवार असावा, अशीही मागणी पुढे आली आहे. (latest marathi news)

नाशिक येथील माजी आमदार डॉ. शोभा बच्छाव व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचीही नावे चर्चेत आली. त्यात आता नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचेही नाव पुढे आले आहे. डॉ. बच्छाव यांचे समर्थक चार दिवसांपासून मतदारसंघात चाचपणी करीत आहेत. डॉ. तांबे बाहेरगावी असल्याने ते आज रात्री उशिरा परतणार आहेत.

काही शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी डॉ. तांबे यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आहे. डॉ. शेवाळे, श्री. सनेर, डॉ. बच्छाव व डॉ. तांबे या चौघांपैकी कोणाला उमेदवारी मिळते, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. उमेदवारीबाबत दररोज नवी नावे, नवे चेहरे समोर येत असल्याने इच्छुकांमध्येच कमालीची अस्वस्थता आहे. न जाणो, ऐनवेळी दुसरेच नाव पुढे यावे, या भीतीतून सर्वांमध्ये सध्या ‘टूबी आॅर नॉट टूबी’ अशी स्थिती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT