Subhash Bhamre, Shobha Bachhao esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : दुरंगी की तिरंगी...लढतीचे तूर्त त्रांगडे! वंचित बहुजन आघाडी छाननीत बाद

Lok Sabha Constituency : राज्यात बहुतांश लढतीचे चित्र स्पष्ट झालेले असताना लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज शनिवारी (ता. ४) छाननीत बाद झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Constituency : राज्यात बहुतांश लढतीचे चित्र स्पष्ट झालेले असताना लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज शनिवारी (ता. ४) छाननीत बाद झाला. त्यामुळे लढत दुरंगी की तिरंगी होणार, याचे त्रांगडे तूर्त कायम आहे. वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या एका याचिकेवर सोमवारी (ता. ६) उच्च न्यायालयात सुनावणीसह निकालाची शक्यता आहे. ( Vanchit Bahujan Aghadi is under scrutiny )

त्यावर दुरंगी- तिरंगी लढतीचे चित्र अवलंबून असून सोमवारी माघारीनंतर चिन्हवाटप, वैध- अवैध उमेदवार यादीसंदर्भात अंतिम प्रक्रिया पार पडेल. वंचित बहुजन आघाडीने ३१ मार्चला ट्विटरवर महाराष्ट्र लोकसभा निवडणूक- २०२४ साठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात आयपीएस अब्दूर रेहमान यांचे लोकसभेच्या धुळे मतदारसंघातून उमेदवारीसाठी नाव होते. ते १९९७ च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

मात्र, ते १२ डिसेंबर २०१९ पासून कर्तव्यावर गैरहजर आहेत. तसेच त्यांच्याबाबत शासन स्तरावर दोन विभागीय चौकशा सुरू आहेत. श्री. रेहमान यांची स्वेच्छानिवृत्तीची विनंती केंद्र सरकारने अमान्य केली. तसेच त्यांनी २२ फेब्रुवारी २०२४ च्या अर्जानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यास परवानगी मिळण्याची विनंती अमान्य करण्यात आली. यासंदर्भात आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे. त्यावर सोमवारी सुनावणीसह अंतिम निकालाची शक्यता आहे.

सोमवारकडे सर्वांचे लक्ष

असे असताना श्री. रेहमान यांनी तांत्रिक मुद्याच्या आधारे छाननीत अर्ज बाद झाल्याचे सांगितले, तर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी श्री. रेहमान यांना मंजूर राजीनाम्याचे पत्र व पुरक कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली. त्यानुसार श्री. रेहमान मंजूर राजीनाम्याचे पत्र सादर करू शकले नाहीत. (latest political news)

त्यामुळे छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. या निर्णयाचे उच्च न्यायालयात सोमवारी सादरीकरण केले जाईल, असे श्री. रेहमान यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष सोमवारच्या निकालाकडे असेल. त्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघातील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

तिघा पक्षांत धाकधूक

मतदारसंघातील अशा घडामोडींमुळे काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीत धाकधूक वाढते आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रेहमान रिंगणात राहिले तर ते भाजपला हायसे वाटणारे ठरेल. याउलट ते रिंगणात राहिले नाहीत तर काँग्रेसला हायसे वाटेल, असे चित्र दिसते. मुस्लीमबहुल भाग काँग्रेसचा पारंपरिक मतदार असल्याचे मानले तरी मुस्लीमबहुल भागातील अनेक मतदार वंचित बहुजन आघाडीला पसंती देतात.

अशा भागांवर काँग्रेसची, त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीची भिस्त असते. मुस्लीम, दलित मतदार चांगल्या प्रमाणात वंचित आघाडीकडे वळले तर त्या भागात मताधिक्य घटण्याची भिती काँग्रेसला असते, ती स्थिती आपल्यासाठी फलदायी ठरते असे भाजपला वाटत असते.

काँग्रेस, भाजपमधील सूर

मतविभाजन शक्यतेच्या कोलाहलात मुस्लीम घटक आपल्यापासून दूर जायला नको म्हणून काँग्रेस हा वंचित आघाडीमुळे घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करणे टाळते आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या हातात श्री. रेहमान यांच्या स्वेच्छानिवृत्ती, राजीनामा मंजुरीचा विषय असताना केवळ दुर्लक्ष, गाफील राहिल्याने, तसेच श्री. रेहमान उमेदवारी करू शकत नाहीत, वंचित बहुजन आघाडी त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देईल, अशा अविर्भावामुळे भाजपची काहीअंशी कोंडी झाल्याचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीसंदर्भात नेते ॲड. प्रकाश आंबेडकर अंतिम निर्णय घेतील, तोपर्यंत सोमवारच्या न्यायालयीन निकालाची वाट पाहूया, अशी सावध भूमिका श्री. रेहमान यांनी मांडली आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या उदासीन भूमिकेवर टिकेची झोड उठवली आहे. अशा घडामोडीत तिघा पक्षांची धाकधूक कशी आणि केव्हा कमी होते यासह अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT