ID proofs  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : मतदानास ओळखपत्राचे 12 पुरावे ग्राह्य

Dhule News : आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ साठी होणाऱ्या मतदानावेळी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ईपीक) सादर करू शकत नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ साठी होणाऱ्या मतदानावेळी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ईपीक) सादर करू शकत नाहीत, अशांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी पर्यायी पुरावा म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ अतिरिक्त ओळखपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे. (Dhule Lok Sabha Election 12 ID proofs are required for voting)

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करताना मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करावे. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशांनी त्यांची स्वतंत्र ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त पुढील नमूद कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिला आहे.

त्यात आधारकार्ड, मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड), बँक, टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वत:चे छायाचित्र असलेले नोकरी ओळखपत्र. (latest marathi news)

पॅनकार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरअंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगांतर्गत निर्गमित जॉब कार्ड, केंद्र सरकारच्या श्रममंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन कागदपत्र, खासदार, आमदारांचे अधिकृत ओळखपत्र आदींचा समावेश असेल.

यापैकी मतदाराने मतदान कार्ड किंवा बारा ग्राह्य पुराव्यांपैकी एक ओळखपत्र सोबत आणावे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोयल यांनी पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT