Bank Account esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election 2024 : खास निवडणुकीसाठी उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्ष वेगवेगळया कारणावर खर्च होत असला तरी अनेकदा त्याची कुठेही नोंद होत नाही.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून होणारा वारेमाप खर्च बघता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला खास निवडणुकीसाठी कुठल्याही बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार आहे. तसे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. (Dhule Lok Sabha Election 2024 Instructions candidates open separate bank account news)

निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्ष वेगवेगळया कारणावर खर्च होत असला तरी अनेकदा त्याची कुठेही नोंद होत नाही. या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आता प्रत्येक राजकीय पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी बँक, टपाल खाते आदी ठिकाणी स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे.

नामांकन अर्ज भरताना बँक खात्याची माहिती देणे बंधनकारक आहे. या खात्यातून उमेदवारांना प्रचारासाठी खर्च करावा लागणार आहे. देणी धनादेशाद्वारे करावे लागणार आहे. दर आठ दिवसांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांचा खर्चाचा तपशील बँककडून घेण्यात येईल आणि नोंद त्यांच्याकडे राहील.  (latest marathi news)

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपयांची खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी दरही ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार उमेदवाराला खर्च सादर करावा लागणार आहे. या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाने पथकही नियुक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Ayurveda Tips: 'या' दोन गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी

पुष्पा 2 चं बहुचर्चित Kissik आयटम सॉंग रिलीज ; श्रीलीलाच्या अदांसमोर समांथाही पडली फिकी

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT